Maharashtra Corona Update : केरळ, पंजाब आणि महाराष्ट्र या तीन राज्यातील कोरोना रुग्णांची आणि मृत्यूची संख्या ही चिंताजनक पातळीवरती पोहोचली आहे. एबीपी माझाने 8 मार्च ते 15 मार्च या आठवड्याचे देशाचे विश्लेषण केले. त्यामध्ये महाराष्ट्रात अनेक बाबतीमध्ये आघाडीवर आहे हे दिसून येत आहे. देशाच्या तुलनेत केरळ आणि महाराष्ट्राची मिळून सात ते आठ टक्के लोकसंख्या होते. पण या दोनच राज्यांमध्ये मिळून देशाच्या 60 ते 70 टक्के रुग्ण आहेत. गेला महिनाभरामध्ये देश पातळीवरती एकूण कोरोना रुग्णसंख्येमध्ये  30 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर 28 टक्के मृत्यू वाढले आहेत. देशांमध्ये रोज सुमारे तीस हजार नवे रुग्ण नोंदवले जात आहेत. परंतु या तीन राज्याची तुलना केली तर महाराष्ट्र अनेक पातळीवर ती आघाडीवर आहे. रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या दरामध्ये मात्र महाराष्ट्र आघाडीवरती आहे असे दिसत आहे.


Coronavirus | आजही राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा मोठाच; संकट कायम


पंजाब, महाराष्ट्रात मृत्यूची आकडेवारी अतिशय चिंताजनक
आपण तीन राज्यांची जर तुलना केली तर केस फॅटीलीटी म्हणजे शंभर व्यक्ती मागं किती कोरोनाग्रस्तांचे मृत्यू होतात याची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. देशाचा हा दर 1.79 टक्के आहे. मात्र पंजाब या राज्याचा दर 3.15 टक्के तर महाराष्ट्राचा 2.35 टक्के आहे. परंतु केरळसारख्या राज्यात मात्र रुग्णांची योग्य ती काळजी घेतलाने हा दर अवघा 0.4 टक्के आहे.


लसीकरणाचा वेग वाढवणे हाच कोरोनावर मात करण्यासाठीचा एकमेव पर्याय, व्यावसायिकांचं मत 


देशात दर हजारी पंजाबात मध्ये 35 रुग्ण दुर्दैवाने मृत्युमुखी पडतात तर केरळमध्ये की जिथे महाराष्ट्र एवढीच कोरोना बाधितांची संख्या विक्रमी आहे तिथे मात्र अवघे चार रुग्ण मृत्युमुखी पडतात पण महाराष्ट्रामध्ये एक हजार व्यक्ती मागत 23 ते 24 रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत.


चाचण्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र अतिशय मागे


चाचण्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र अतिशय मागे आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी मोहिम मुख्यमंत्र्यांनी करून सुद्धा महाराष्ट्रात अतिशय कमी चाचण्या आहेत. देशांमध्ये दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत 1,65,000 चाचण्या होत आहेत. केरळमध्ये तीन लाख सहा हजार रुग्णांची चाचणी केली जाते. पण महाराष्ट्रामध्ये मात्र तुलनेत कमी चाचण्या होत आहेत. एवढ्या कमी की त्या गुजरात आणि बिहारपेक्षा कमी आहेत. त्यामुळेच देशामध्ये सर्वात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव आणि प्रकोप महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. कोरोना रोखायचा असेल तर अधिक चाचण्या, योग्य त्या आरोग्य सुविधा आणि रुग्णापर्यंत पोहोचून त्यांची काळजी घेणे सुरुवातीपासून महाराष्ट्र यामध्ये कमी पडताना दिसतोय. यामुळं परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह आहेत