Maharashtra Rains : पावसामुळे तीन ते चार महिन्याचा आंबा सीझन दोन महिन्यावर येणार, शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान
Unseasonal Rain in Maharashtra : कोकणात गेल्या 15 दिवसापासून पावसाचे प्रमाण कायम असल्याने याचा प्रचंड मोठा फटका हापूस आंबा पिकावर झाला आहे.
नवी मुंबई : कोकणाला पावसाने झोडपले असल्याने याचा सर्वात मोठा फटका हापूस आंबा पिकाला बसला आहे. पावसामुळे आलेला मोहोर गळून गेला आहे तर आलेल्या आंबा पिकावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षी तीन ते चार महिन्याचा आंबा सिझन फक्त दोन महिन्यावर येणार असल्याने शेतकरी वर्गाचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे.
कोकणात गेल्या 15 दिवसापासून पावसाचे प्रमाण कायम असल्याने याचा प्रचंड मोठा फटका हापूस आंबा पिकावर झाला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्हातून हापूस आंबा एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत असतो. फेब्रुवारी महिन्यात आंब्याची आवक सुरू झाल्या नंतर मार्च , एप्रिल , मे महिन्यात आंब्याच्या पेट्यांनी एपीएमसी भरलेली असते. मार्चमध्ये दिवसाला 10 हजार पेटी आवक होणारा हापूस मे महिन्यात दिवसाला 1 लाख पेट्यांच्यावर आवक जात असते. त्यामुळे फेब्रुवारी ते मे असा चार महिने हापूस आंब्याची चव सर्वसामान्यांना चाखता येत असते. मात्र आता कोकणात पडत असलेल्या आवकाळी पावसामुळे आंबा पिकाचा मोहोर गळू लागल्याने याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.
फेब्रुवारी, मार्च महिन्यात हापूस आंब्याला मार्केटमध्ये चांगला दर मिळतो. त्यामुळे कोकणातील शेतकरी या सुरवातीच्या दोन महिन्यात आपले आंबा पिक कसे मार्केटला दाखल होईल याची काळजी घेत असतात. यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पिकाला मोहोर आणत. फेब्रुवारी , मार्च मध्ये फळ काढतात. गेल्या 15 दिवसापासून कोकणात पाऊस पडत असल्याने आलेला मोहोर पुर्ण पणे गळू लागल्याने फेब्रुवारी , मार्चमध्ये येणारा हापूस आंबा नष्ट झाला आहे. त्याचबरोबर ज्या झाडांवर फळधारणा झाली आहे. त्यावर पावसाचे पाणी पडल्याने त्याला काळे डाग पडले आहेत किंवा पावसाने थेट कमजोर होवून फळ जमिनीवर पडू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेली फवारणी वाया गेली असल्याने लाखोंचे नुकसान औषधांच्या मागे सोसावे लागत आहे. यापुढे झाडाला लागणाऱ्या मोहोर मुळे एप्रिल , मे महिन्यात आंबा पिक बाजारात दाखल होईल. सर्व ठिकाणावरून आवक एपीएमसीमध्ये झाल्यास दर कोसळून शेतकरी वर्गाला उत्पादन खर्च काढणे जिकीरीचे जाणार असल्याचे एपीएमसी मधील घाऊक व्यापारी असलेले संजय पानसरे यांनी सांगितले.
Solapur Rains : अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका ABP Majha
संबंधित बातम्या :
Maharashtra Rains : अवकाळीचा कहर! राज्यात शेकडो शेळ्या-मेंढ्या मृत; गारठा बाधतोय, काळजी घ्या