Maharashtra Rain LIVE Update | अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका
Maharashtra Rain LIVE Update | राज्यभरातील, प्रत्येक शहरातील, गावा खेड्यातील पावसासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर... राज्यातील अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे-सोलापूर हायवेवर पावसामुळे ट्रॅफिक जॅम (Traffic on Pune Solapur Highway) झालं आहे. तर पुण्यातही सकाळी पावसाने उसंत घेतली तरी रात्रभर पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं. साचलेल्या पाण्यामुळे पुण्यातही अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक भागांत ट्रॅफिक जॅम (Pune traffic Update) झालं आहे. याशिवाय इंदापूर (Indapur), पंढरपूर (Pandharpur), सांगली (Sangali) या भागांतही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain LIVE Update | पुढील चार दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून, 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास होईल. 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 14 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून, 15 आणि 16 तारखेला मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. गेला आठवडाभर राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीच्या काळात राज्यात मोठा पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात
पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यातील पावसाचा जोर काही वेळात कमी होईल असा अंदाज वेधशाळेने दिला आहे. तोपर्यंत पुणेकरांना आजची संपूर्ण रात्र जागून काढावी लागण्याची शक्यता दिसत आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस आणि अनेक भागातील वीज गायब झाली आहे. पाषाण, कर्वे नगर या भागातील वीज गायब आहे तर बिबवेवाडी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या माझे कुटुंब माझो जबाबदारी मोहिमेअंतर्गत गृह सर्वेक्षण स्थगित केले आहे. तसेच पुणे -सोलापुर हायवे पावसामुळे बंद केला आहे. उजनी धरणाचे पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर येथे हायवेवर आल्याने पुण्यातुन सोलापुरकडे जाणारी वाहतुक लोणी काळभोर येथे थांबवली आहे. कोणीही सोलापुर दिशेने प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. उजनी धरणाचे 42 दरवाजे उघडले आहेत.
पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय. गेल्या तीन तासापासून पावसाची संततधार सुरूच. मावळ तालुक्यात ही पाऊस बरसतोय. रात्रभर पावसाने जोर सुरूच ठेवला तर पवना धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतोय. त्यामुळं पवना नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे-सोलापूर हायवेवर पावसामुळे ट्रॅफिक जॅम (Traffic on Pune Solapur Highway) झालं आहे. तर पुण्यातही सकाळी पावसाने उसंत घेतली तरी रात्रभर पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं. साचलेल्या पाण्यामुळे पुण्यातही अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक भागांत ट्रॅफिक जॅम (Pune traffic Update) झालं आहे. याशिवाय इंदापूर (Indapur), पंढरपूर (Pandharpur), सांगली (Sangali) या भागांतही मुसळधार पाऊस कोसळत आहे.