एक्स्प्लोर

मुंबईकरांनो सावधान! केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र, पुढील 3 दिवस राज्यात कोसळणार जोरदार पाऊस

Maharashtra Rain : पुढील तीन दिवस म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Maharashtra Rain : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार परतीचा पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane), रायगड या भागात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

14 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होणार

केरळ किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्र सध्या लक्षद्विप वरून अरबी समुद्राच्या मध्यावर पोहोचत आहे. परिणामी आजपासून भाग बदलत राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. 14 ऑक्टोबरपासून काही दिवसासाठी काहीशी उघडीप जाणवेल. शेतपिके व फळबागांना या पावसापासून कदाचित काहीसा अपाय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आवर्तनातील पावसापासून म्हणजे मंगळवार 22 ऑक्टोबरनंतर होणाऱ्या पावसाचा कोकणातील शेतपिके व फळबागांना फायदाच होईल असे वाटत असल्याचे खुळे म्हणाले.  

13 ऑक्टोबर पर्यन्त महाराष्ट्राबरोबर मुंबईसह कोकणातही पावसाची शक्यता

दिड किमी उंचीवर महाराष्ट्राच्या भुभागावर ताशी 28 तर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ताशी 37 किमी वेगाने पूर्वेकडून ह्या अरबी समुद्रातील हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे वारे वाहत आहे. दोन्हीही समुद्रातून होणाऱ्या बाष्प पुरवठ्यामुळे रविवार 13 ऑक्टोबर पर्यन्त महाराष्ट्राबरोबर मुंबईसह कोकणातही हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, परतीचा पाऊस अजुन नंदुरबार पर्यंतच जागेवर खिळलेला असल्याचे खुळे म्हणाले. 

मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली, पश्चिम उपनगर, कुर्ला या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस

मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली, पश्चिम उपनगर, कुर्ला या भागात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच या पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह मुंबई पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुढील 120 मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. याचा मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संथ गतीनं वाहतूक सुरु आहे. त्यामुळं नागरिकांना त्रा सहन करावा लागतोय.

महत्वाच्या बातम्या:

मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Shree Ram Murti : नाशिक तपोवनमध्ये 70 फूट श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे लोकार्पणRahul Shevale PC | शिंदेंच्या दसरा मेळाव्यात 2 लाखांपेक्षा जास्त शिवसैनिक येतील- राहुल शेवाळेNavneet Rana PadYatra | नवरात्री निमित्ताने राणा दाम्पत्याची अंबादेवी मंदिरात पदयात्राNasim Khan on BJP | मुस्लीम समाजाला धमक्या देणाऱ्या भाजपा नेत्यांवर कारवाई कधी करणार? -नसीम खान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Embed widget