Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी, शेतीच्या कामांना वेग

कालपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पूरस्थिती होती, त्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jul 2022 02:33 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसानही झालं आहे. तर काही ठिकाणी...More

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला होता. अशातच आता उद्यापासून (23 जुलै) राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं ( Meteorology (Department) दिला आहे. पुढील चार दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.