(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अन् अजित पवार आदित्य ठाकरेंना म्हणाले मुख्यमंत्री, पाहा व्हिडीओ
Ajit Pawar Deputy Chief Minister of Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली.
Ajit Pawar Deputy Chief Minister of Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी मुळशीचे सुनील चांदेरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे यांच्यातल्या चर्चेनंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आणि ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध कठोर करावे लागतील असं सांगितले. कोरोना परिस्थिती आणि निर्बंधाबात बोलताना अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्री म्हटलं आहे. अजित पवारांकडून चुकून हा उल्लेख झाला आहे. पण सोशल मीडियावर याचे ताक्ताळ उमटल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती पाहता दिवसा जमावबंदी आणि रात्री नाईट कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण ऑक्सिजनची मागणी वाढली तर त्याबद्दलचे निर्णय मुख्यमंत्री या नात्यानं आदित्य ठाकरे साहेब घेतील.
यावेळी अजित पवार यांनी बोलण्याच्या ओघात थेट आदित्य ठाकरे यांचाच थेट मुख्यमंत्री असा उल्लेख केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे. विरोधकाकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे सर्व स्तरांवरून मुख्यमंत्रीपदाचा कारभार दुसऱ्या व्यक्तींकडे सोपविण्याची मागणी होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.
पाहा व्हिडीओ
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू शकतात याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सूचक इशारा दिला आहे. महाराष्ट्रात जर ऑक्सीजन बेडची मागणी वाढत गेली आणि ऑक्सिजनची मागणी सातशे मेट्रिक टनपर्यंत गेली तर मुख्यमंत्री राज्यातील निर्बंधांबाबत कठोर निर्णय घेतील, असं अजित पवार यांनी पुण्यात बोलताना म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :