नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना इशारा
Ajit Pawar : पुण्यात मास्क नसेल तर 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे. मास्क नसेल आणि थुंकल्यास 1000 रुपये दंड आकरण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
![नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना इशारा Maharashtra Pune Ajit Pawar on new rules in corona omicron Pune नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/16/f9646512debb99d3ff83dc3dfde28696_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असून पॉझिटिव्ही दर 18 टक्क्यांच्या वर गेला आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्याच निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील 74 टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. उर्वरित नागरिकांना लसीचा दुसरा डोस न घेतल्यास कठोर निर्णय घेण्यात येईल, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला आहे.
पुण्यात मास्क न घातल्यास 500 रुपये दंड
पुण्यात मास्क नसेल तर 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे. मास्क नसेल आणि थुंकल्यास 1000 रुपये दंड आकरण्यात येणार आहे. तसंच दोन डोस पूर्ण नसतील तर हॉटेल, बस, शासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्याचही पवारांनी म्हटलं आहे.
पुण्यात नो वॅक्सीन नो एन्ट्री
कोरोना लशीचे दोन डोस घेतले तरच सगळ्या ठिकाणी प्रवेश अन्यथा प्रवेश मिळणार नाही. लशीचे दोन्ही डोस घेतले तरच आता सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाईल .यापूर्वीही अनेकदा याचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. परंतु आजवर याचे पालन झाले नाही. आता मात्र याची अंमलबजावणी केली जाईल. हॉटेल, बार, शासकीय आणि खासगी आस्थापनामध्ये लशीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच प्रवेश दिला जाईल. लसीचे दोन डोस घेतले नसतील तर अशा व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
10 जानेवारीपासून 60 वर्षावरील व्यक्तीला बूस्टर डोस दिला जाणार
10 जानेवारीपासून 60 वर्षावरील व्यक्तीला बूस्टर डोस दिला जाणार आहे. फ्रंटलाईन वर्कर काम करणाऱ्या व्यक्तीला देखील बूस्टर डोस दिला जाणार आहे. दर तीन दिवसांनी रुग्णाचा दर पुण्यात डबल होत आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत आहे. आगामी 40 ते 45 दिवसात याचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. जगातील 105 देशात याचा संसर्ग झाला आहे.
साधे मास्क सुरक्षित नाहीत
वेगेवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क वापरण्याऐवजी थ्री लेअर किंवा N95 मास्क वापरावे. साधे मास्क सुरक्षित नाहीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Ajit Pawar Live : स्टायलिश मास्क नको, थुंकल्यास 1 हजाराचा दंड, अजित पवारांचे 5 मोठे मुद्दे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)