(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav & Raj Thackeray Rally in Konkan: कोकणात ठाकरेंच्या तोफा धडाडणार! महाडमध्ये उद्धव आणि खेडमध्ये राज ठाकरेंची सभा; बारसू रिफायनरीवर राज भूमिका स्पष्ट करणार?
Uddhav & Raj Thackeray Rally in Konkan: उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा होत असून राज ठाकरे यांची खेडमध्ये सभा होत आहे. त्यामुळे या दोन्ही सभांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.
Uddhav & Raj Thackeray Rally in Konkan: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात बारसू रिफायनरीवरून रणकंदन सुरु असतानाच आज (6 मे) दोन ठाकरे बंधू कोकण भूमीमध्ये आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाडमध्ये आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज खेडमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा होत असून राज ठाकरे यांची खेडमध्ये सभा होत आहे. त्यामुळे या दोन्ही सभांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनवरीवरून रणकंदन सुरु आहे. बारसूमध्ये आंदोलन करत असलेल्या स्थानिकांवर पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर संतापाची लाट उसळली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सोलगावमध्ये स्थानिक ग्रामस्थांची भेट घेत त्यांची मते जाणून घेतली. बळाचा वापर करणार असाल, तर रिफायनरीला आमचा कडाडून विरोध असेल, आम्ही स्थानिकांसोबत असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. त्यांनी कातळशिल्पला भेट देत पाहणी केली. जर इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणार असतील प्रकल्प हवे आहेत. पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर असे प्रकल्प नकोत. आम्ही विकासाच्या आड येणार नाही, पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर आम्ही विरोध करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
स्नेहल जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
बारसूत भेट देऊन झाल्यानंतर त्यांची आज महाडमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेकडे सुद्धा लक्ष असेल.या सभेतून शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा आहे. त्या आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत. महाडमधील राजकीय सभेमध्ये उद्धव ठाकरे कोणावर बरसणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. वज्रमूठ सभांना स्थगिती मिळाल्याने या सभेमधून ते कोणावर प्रहार करतात याकडेही लक्ष असेल.
राज ठाकरे खेडमध्ये काय बोलणार?
दुसरीकडे राज ठाकरे यांची सुद्धा सभा आज खेडमध्ये होत आहे. राज ठाकरे पक्षबांधणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दौरा करत आहेत. याच रणनीतीचा एक भाग म्हणून आज सभा पार पडत आहे. खेडमधील सभेसाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारसू रिफायनरीवर अधिकृतपणे कोणतीही भूमिका राज ठाकरे यांनी घेतली नसली तरी आज स्पष्टपणे बोलण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राज्य सरकार या मुद्यावरून आमनेसामने आले असताना मनसे काय भूमिका घेणार? याबाबत राज ठाकरे कोणते आवाहन करतात का? याकडे सुद्धा लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या