आज (23 नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस, भाजपचे काही नेते तसंच अजित पवार राजभवनावर पोहोचले. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
सुप्रिया सुळे कायमच आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला कुटुंबातील व्यक्तींचे, मित्रपरिवारातील लोकांचे फोटो ठेवतात. परंतु आज अजित पवारांच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंनी ठेवलेली दोन्ही व्हॉट्सअॅप स्टेटस अतिशय बोलकी आहेत. "विश्वास कोणावर ठेवायचा. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी फसवणूक. त्याच्या पाठिशी उभी राहिले. त्याला प्रेम दिलं आणि बघा मोबदल्यात मला काय मिळालं," असंही त्यांचं पुढचं व्हॉट्सअॅप स्टेटस आहे.
अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक : शरद पवार
अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला शरद पवारांचा पाठिंबा आहे का?, याबाबत चर्चा सुरु होत्या. शरद पवारांच्या एका ट्वीटनंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ''अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.''
संबंधित बातम्या
- महाराष्ट्रात मोठा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री
- अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही : शरद पवार
- Maharashtra Politics | अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला : संजय राऊत