मुंबई : बहुमताच्या चाचणीत आम्ही भाजपला पराभूत करु - नवाब मलिक

राज्याच्या राजकारणात सगळ्यात मोठा भूकंप, देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदी विराजमान

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Nov 2019 08:58 PM
मुंबई : बहुमताच्या चाचणीत आम्ही भाजपला पराभूत करु, पाच आमदार अजूनही संपर्कात नाहीत, उरलेले आमदार बैठकीत उपस्थित, नेता निवडीपर्यंत जयंत पाटलांकडे सर्व अधिकार - नवाब मलिक

अजित पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेता पदावरुन हकालपट्टी; यापुढील सर्व अधिकार शरद पवार आणि जयंत पाटील यांना देण्यात आले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी आमदारांची लगबग, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे काँग्रेसचे लक्ष
पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला; अजित पवारांचा आमदारांकरवी शरद पवारांना संदेश
राज्यातील सत्तासंघर्षावरुन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टात जाणार, आज रात्रीच सुनावणी व्हावी, अशी तयारी चालू असून रजिस्ट्रार ऑफिसमध्ये वकील पोहोचले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे शरद पवारांकडे परतले...
महाविकास आघाडी कोर्टात जाण्याच्या तयारीत; रात्रीतून सत्तास्थापनेचा घाट अन् घाईघाईत शपथविधी आटोपला, यावर शिवसेनेचा आक्षेप
सत्तास्थापनेच्या नाट्याला कलाटणी, धनंजय मुंडे शरद पवारांकडे परतले?
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या चर्चेसाठी धनंजय मुंडे पोहोचले,
मी इथेच आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर दिली.
बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या समर्थकांत उभी फूट. बारामतीतील नगरसेवक, युवकचे पदाधिकारी अजित पवारांच्या पाठीशी तर जेष्ठ नागरिक आणि सामान्य बारामतीकर शरद पवार यांच्या पाठीशी. ‌बारामती नगर परिषदेच्या जवळ लावण्यात आलेला हा फ्लेक्स बराच काही सांगून जाणारा आहे.

शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राने फर्जिकल स्ट्राईक केला : उद्धव ठाकरे
सकाळी 7 वाजता मुंडेंच्या बंगल्यावर या असा निरोप आला. आम्हाला राजभवनात नेलं, पण कशासाठी नेलं हे माहित नव्हती, मी शरद पवारांसोबत, त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणार : आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती
10 ते 11 सदस्य अजित पवारांसोबत आहेत, जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात तिन्ही पक्ष एकत्र काम करतील : शरद पवार
प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही, सकाळी साडेसहा वाजता राजभवनावरील हालचालींची माहिती मिळाली - शरद पवार
अजित पवार यांचा निर्णय पक्षाच्या विरोधात आहे. प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही : शरद पवार
सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चर्चा सुरु होती : शरद पवार
ट्वीटरच्या ऑलइंडिया ट्रेंड्स मध्ये जवळपास 20 ट्रेंड्स महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित

1. #MaharashtraPolitics
2. #MaharashtraGovtFormation
3. #Motabhai
4. #DevendraFadnavis
5. #BJPNCP
6. Ajit Pawar
7. Sharad Pawar
8. Sanjay Raut
9. Congress
10. संजय राऊत
11. #ShivaSena
12. #Devendra4Maharashtra
13. #Amitshah
14. #MahaKhichadiSarkar
15. #UddhavThackeray
16. #DevendraIsBack
17. #surgicalstrike
18. #MaharashtraPoliticalCrisis
19. #Chanakya
20. #महाराष्ट्र
21. #GameofThrones
26. #संजय_राऊत
एक दोन जण गेले म्हणजे राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते गेले असं होत नाही. धनंजय मुंडे, कुठे माहित नाही, पण ते गेल्याने काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली.
अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी
संघर्षाचा काळ कधी संपत नाही. प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं. संघर्षातूनच आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली. संघर्षातूनच ती आणखी पुढे जाईल, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

व्हाय. बी सेंटरला राष्ट्रवादीचे सर्व नेते पोहोचले पण धनंजय मुंडे अद्याप पोहोचले नाही - सूत्र
संघर्षाचा काळ कधी संपत नाही. प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं. संघर्षातूनच आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली. संघर्षातूनच ती आणखी पुढे जाईल.
आज दुपारी 3 वाजता भाजपची कोअर कमिटीची पुन्हा बैठक, मुख्यमंत्री भाजप प्रदेश कार्यालयात जाणार
उद्धव ठाकरे बैठकीसाठी वाय बी चव्हाण सेंटरकडे रवाना, सोबतीला आदित्य आणि तेजस ठाकरे देखील
अशोक चव्हाण वाय बी सेंटरला पोहोचले, थोड्याच वेळात बैठक
170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा, सूत्रांची माहिती
पक्ष आणि कुटुंबात फूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस
पक्ष आणि कुटुंबात फूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस
शरद पवारांकडून राष्ट्रावादीच्या सर्व आमदारांना बोलावणं; संध्याकाळी साडेचार वाजता व्हायबी सेंटरला बैठक
देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार, मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज दुपारी 12.30 वाजता ही पत्रकार परिषद होणार
आमदार फुटल्याची माहिती नाही : राष्ट्रवादी नेते जयंत पाटील
अजित पवार यांनी शरद पवारांना दगा दिला : संजय राऊत
अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला काळिमा फासला, बंडखोर आमदांना रस्त्यावर फिरु देणार नाही : संजय राऊत
अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला काळिमा फासला, बंडखोर आमदांना रस्त्यावर फिरु देणार नाही : संजय राऊत
अजित पवार यांची देहबोली संशयास्पद होती, या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही हे ठामपणे सांगू शकतो : संजय राऊत
अजित पवार यांचा निर्णय वैयक्तिक, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही : शरद पवार

अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला : संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी आज सकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात
अजित पवारांच्या शपथविधीच्या वेळी राष्ट्रवादीचे 15 आमदार उपस्थित होते
शिवसेनेचे 17 आमदार भाजपच्या संपर्कात - सूत्र
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारच्या निर्मितीच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होते. त्यांनीच अजित पवारांना पाठिंबा दिला असणार.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या संमतीने कोणताही निर्णय घेत नाही: सूत्र

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्या बद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे, नितीन गडकरींचं ट्विट
शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवला
महाराष्ट्राला खिचडी सरकार नको होतं, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टीका, पाच वर्षे स्थिर सरकार देणार असल्याचाही विश्वास

पार्श्वभूमी

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तर भाजपला संपूर्ण राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे की, अजित पवारांसोबत आमदारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

"विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आलं नव्हतं. शेतकऱ्यांसह राज्य अनेक अडचणींचा सामना करत होतं. त्यामुळे स्थिर सरकार बनवण्यासाठी हा निर्णय घेतला," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर राजभवनात दिली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.