Uddhav Thackeray : '..म्हणून पंतप्रधान हवं त्यांना भारतरत्न देत आहेत', उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : नुकताच देशातील दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. यावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर गंभीर आरोप केलेत.
Uddhav Thackeray : नुकताच देशातील 3 दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna) जाहीर झाला. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ट्विट करून दिली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतं हवीत म्हणून हवं त्यांना भारतरत्न देत आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटंलय. मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानिय लोकाधिकार समिती अधिवेशनातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
"जिवंत असताना त्यांना विरोध तुम्ही केला" - उद्धव ठाकरे
भारतरत्न पुरस्कारावरून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'मोदींना हवं त्यांना भारतरत्न देत आहेत, ज्यांचा जिवंत असताना विरोध तुम्ही केला, जसे की करपुरी ठाकूर, त्यांना जनसंघाने विरोध केला होता, तेव्हा तुम्ही देखील त्यांना विरोध केला, आता बिहारध्ये मत हवे म्हणून त्यांना भारतरत्न देत आहात, तसेच आम्ही तेव्हा मागणी केली होती एम.एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, जर भारतरत्न देत आहात तर त्यांनी दिलेला अहवाल देखील लागू करावा, हा पोकळपणा आहे, येत्या काळात आणखीन काही भारतरत्न जाहीर करतील, भाजपला वाटत आहे की, एक अख्खा प्रदेश आपल्या बाजूने येईल, पण आता असे राहिले नाही.'
'आज काल फोन येतो, मोदी सरकारला मत देणार का?'
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, भाजपकडे करोडो रुपये आहेत, 1300 कोटी भाजपला मिळाले आहेत, भाडोत्री लोक खूप आहेत, भाडे मिळाले की काहीही मिळते, आजकाल फोन येतो, मोदी सरकारला मत देणार का? पण मोदी सरकार जो खर्च करत आहेत तो पैसा भारत सरकारचा नाही का? एका शेतकऱ्याने सांगितले आहे, की मी कुटुंबासह आत्महत्या करेन पण मोदींना मत देणार नाही.
'प्रश्न विचारले तरी, पाकिस्तानात जा म्हणायचे'
उद्धव ठाकरे पंतप्रधानावर टीका करत म्हणाले, नेहरू जाऊन आता 60 वर्ष झाली, नेहरू किती काळ सतेत होते? त्यानंतर व्ही पी सिंग, वगैरे होते, त्यांचे काय, मोदी तुम्ही 10 वर्ष, अटलजी यांची 5 वर्ष, जनता पक्षाची वर्ष मिळून तुम्ही जास्त काळ सत्तेत आहात, सगळे काही प्रश्न दुसऱ्यावर टाकायचे आणि तरी प्रश्न विचारले तरी पाकिस्तानात जा म्हणायचे. हा जो राज्यकर्ता आहे तो नालायक आहे, असे मला म्हणावे लागेल, हा माझा अधिकार आहे, त्यांना मित्र आणि शत्रू यातला फरकच कळाला नाही.
"धर्माचा ध्वज आज अडाण्यांच्या हातात गेला आहे"
उद्धव ठाकरे म्हणतात, माझ्यासोबत मला सोन्यापेक्षा चांगली माणसं मला हवी आहेत, ही जी लोकं एकडे बसली आहेत, ती सोन्यापेक्षा चांगली आहेत, ती मला हवी आहेत, अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्या सोबत येत आहेत, घरी घेऊन भेट देत आहेत, मी कडवट हिंदुत्ववादी आहे, तरी आमच्या सोबत का येता? असं मी त्यांना विचारलं, पण यावर त्यांचे म्हणणे आहे की तुमचे आणि भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे, त्यांचे हिंदुत्व घर मोडते, माझ्या आजोबांचे म्हणणे होते माणसाने धर्म बनवला आहे, धर्माने माणूस बनवला नाही, तुम्ही जे काही करत आहात ते पाप आहे. हे विषय लोकांपर्यंत पोचायला हवी, तुम्ही जाऊन लोकांशी बोलायला हवे, मी RSS च्या लोकांना विचारतो की, तुम्ही याच साठी केला होता का अट्टाहास? हे उपरे आता बसवले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का? धर्माचा ध्वज आज अडाण्यांच्या हातात गेला आहे, त्या ध्वजावरून आता आपल्याच धर्माचे रक्त ठिबकत आहेत, अजूनही माझ्या पक्षात जे भेकड आहेत त्यांनी आताही त्यांच्याकडे जावे, मला गरज नाही, मूठभर मावळे चालतील, तुम्ही देखील जिवंत मावळे आहात, लोकाधिकार यांनी जे हातात घेतले, ते सोडत नाहीत, त्यामुळे तुमच्यावर मला विश्वास आहे