Shivsena : शिवसेना पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण (Thane District) जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 


या कारणामुळे दिला राजीनामा
पक्ष नेतृत्वाकडून संशय व्यक्त केला जात असल्याने अपमानित होऊन राहण्यापेक्षा शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख पदासह शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यता राजीनामा देत असल्याची घोषणा करत प्रकाश पाटील यांनी पडघा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या या घोषणेनंतर ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये पडसाद उमटणार असून अनेक शिवसैनिक पदाधिकारी हे व्यतित झाले आहेत. तर त्यांच्या या निर्णयामुळे सेनेला मोठा धक्का बसला आहे. 


ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये पडसाद उमटणार, पक्षनेतृत्वावर नाराजी
प्रकाश पाटील म्हणतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे सहभागी झाले, त्यात माझा कोणताही सहभाग नसताना पक्ष नेतृत्वासह पदाधिकारी यांनी संशय व्यक्त करीत अविश्वास व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपण व्यथित असून तब्बल 35 वर्षे शिवसेना संघटनेत शाखा प्रमुख ते जिल्हाप्रमुख पदापर्यंत काम करीत असताना पक्ष संघटना वाढीसाठी निस्वार्थ प्रयत्न केले. सध्या पक्ष नेतृत्वाकडून संघटनेच्या कामातून आपणास खड्यासारखे बाजूला करण्याचे प्रयत्न काही हितशत्रू पक्ष नेतृत्वाच्या साथीने करीत आहेत त्यामुळे अपमानित होऊन संघटनेत राहण्यापेक्षा स्वाभिमान जपत राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया प्रकाश पाटील यांनी दिली आहे. तूर्तास एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार का? या प्रश्नावर मी संघटनेत केलेल्या कामाचे महत्व ओळखून कोणी आपणास विचारणा केली तर भविष्यात त्या बाबत निर्णय घेऊ अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra Cabinet Expansion : शिंदे गटाचं ठरलं; उदय सामंत, दादा भूसे, गुलाबराव पाटील यांच्यासह हे सात मंत्री शपथ घेणार, सत्तारांचा पत्ता कट?


Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं! तारीख अन् वेळ निश्चित, राजभवनावर शपथविधी



Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं; प्रमाणपत्र रद्द, सत्तार म्हणाले..


Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा आज शपथविधी, 18 मंत्री घेणार शपथ? जाणून घ्या