Maharashtra TET Scam : सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात (TET Scam) माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. मात्र बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचा पलटवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा, असं सत्तार यांनी म्हटलं. या प्रकरणाची नीट चौकशी व्हावी. कुणाचीही बदनामी करण्याचं काम कुणी करु नये. चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी असंही सत्तारांनी म्हटलं आहे. 


या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी- अंबादास दानवे 


याबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी म्हटलं की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. यात अब्दुल सत्तारांच्याच नव्हे तर अनेकांची नावं नाहीत तर अनेकांची नावं आहेत. यात विरोधकांचं षढयंत्र असण्याचा प्रश्न नाही. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहोत, कुणी दोषी असेल तर त्यांना शिक्षा व्हावी. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, त्यातच हे आढळलं आहे, असंही ते म्हणाले. सत्तारांच्या मुलांचं शिक्षण आहे, त्यांना त्यामुळंच नियुक्ती मिळाली असेल. मी मुलांवर आरोप करणार नाही मात्र या प्रकरणाची चौकशी मात्र व्हायलाच हवी, असंही अंबादास दानवे म्हणाले. 


हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, आमेर सत्तार अशी सत्तार यांच्या मुलांची नावं आहेत.




टी ई टी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता


महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक गाजलेल्या म्हाडा, आरोग्य आणि टी ई टी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे.  पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टी ई टी परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्र तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून मागून घेतली आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ही सर्व कागदपत्र ईडीच्या ताब्यात सोपवली आहेत.


राज्यातील आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करताना पुणे सायबर पोलीसांना म्हाडा परिक्षेचा पेपर फुटल्याच समजलं होतं.  तर म्हाडाच्या पेपरफुटीचा तपास करताना टी. ई. टी. परिक्षेत गैरव्यवहार झाल्याच समोर आलं होतं. 


दोन दिवसांपुर्वी 2019 साली झालेल्या टी. ई. टी. अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं होतं.  महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाईदेखील होणार असल्याचं सांगितलं होतं.


इतर महत्वाच्या बातम्या


TET Exam Scam : टीईटी घोटाळ्याचा आवाका मोठा! 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र, कारवाईचे आदेश


Pune TET Exam : पुण्यातील TET Exam घोटाळा प्रकरणी दोषारोपपत्र दाखल ABP Majha


मोठी बातमी: टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश, 293 उमेदवारांवर होणार कारवाई


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI