एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis :  का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत, संजय राऊतांचं बंडवीरांना चर्चेचं आमंत्रण

Maharashtra Political Crisis Sanjay Raut :  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना चर्चा करण्याचं आमंत्रण दिलेय.

Maharashtra Political Crisis Sanjay Raut :  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना चर्चा करण्याचं आमंत्रण दिलेय. का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत.. अशी साद घालत संजय राऊत यांनी बंडखोरांना चर्चेचं आमंत्रण दिलेय. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. त्यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचं समजतेय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलेय. 

 शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी बंडखोरांना परत येण्याचं आवाहन केलेय. संजय राऊत यांनी ट्विट करत बंडखोरांना परत येण्याचं आवाहन केले. 

चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत..का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं ट्विट संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसाठी केलेय. संजय राऊत यांच्या ट्विटला एकनाथ शिंदे अथवा इतर कुणी बंडखोर आमदार प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.   

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण... - संजय राऊत
'वर्षा' निवासस्थानात आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांनी सूरतमधून कशी सुटका केली, याबाबत अनुभव मांडले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, पत्रकारांना व इतरांना व्हॉट्सअॅपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील 21 आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली. राऊत यांनी म्हटले की, राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे 20-25 आमदार पुन्हा शिवसेनेत येतील असा विश्वास आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी इच्छा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी. मात्र, त्यांचा हा बहाणा असल्याचे राऊत यांनी म्हटले. सरकारमधून बाहेर पडावे असं त्यांना वाटत असते तर त्यांनी प्रत्यक्षात चर्चा केली असती, असेही राऊत यांनी म्हटले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडे लोकांमधून निवडून आलेत, तुमची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी... गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल
धनंजय मुंडे साहेब हिरा आहेत, अंजली दमानिया तुमची उंची काय? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
Rohit Sharma : रोहित शर्मानं कॅच सुटल्यानंतर मैदानावर हात जोडले, मॅच संपताच अक्षर पटेलला मोठी ऑफर, म्हणाला...
तो कॅच घ्यायला हवा होता, रोहित शर्मानं मॅच संपताच केली घोषणा, अक्षर पटेलला मोठी ऑफर
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 700 AM 20 February 2025 माझं गाव, माझा जिल्हाBakers Issue : नियमांची भट्टी, पावाला धग;मनपाच्या निर्णयाला बेकरी व्यवसायिकांचा विरोध Special ReportZero Hour Full : अजित पवारांचे मंत्री वादाच्या भोवऱ्यात ते पिंपरी चिंचवड, सोलापुरातील समस्याZero Hour : Solapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे :सोलापुरात स्वच्छता मोहिम ;अस्वच्छता कराल...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडे लोकांमधून निवडून आलेत, तुमची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी... गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल
धनंजय मुंडे साहेब हिरा आहेत, अंजली दमानिया तुमची उंची काय? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
Rohit Sharma : रोहित शर्मानं कॅच सुटल्यानंतर मैदानावर हात जोडले, मॅच संपताच अक्षर पटेलला मोठी ऑफर, म्हणाला...
तो कॅच घ्यायला हवा होता, रोहित शर्मानं मॅच संपताच केली घोषणा, अक्षर पटेलला मोठी ऑफर
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
Embed widget