Maharashtra Shiv Sena Vs Eknath Shinde SC Hearing LIVE : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी, संपूर्ण देशाचं लक्ष
Eknath Shinde vs Shiv Sena SC: महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबत निर्णयाची शक्यता, आयोगाच्या नोटीशीचंही भवितव्य ठरणार
Maharashtra Political Crisis :
Shivsena : सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात. शिवसेनेचं निवडणूक चिन्हं कुणाला मिळणार? 16 आमदारांना उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस वैध की अवैध? या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.
Maharashtra Political Crisis : मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. 27 जुलैपर्यंत दोन्ही बाजूंना आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की, नाही याचा विचार सुप्रीम कोर्ट आज करणार आहे.
1. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी
2. गटनेता, व्हिप म्हणून विधानसभा, लोकसभेत शिंदे गटाने केलेल्या नेमणुका अवैध ठरवण्याची मागणी
3. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव वैध की अवैध याचाही निर्णय कोर्टाला करावा लागेल
4. सोबतच निवडणूक आयोगातही ही लढाई पोहोचली आहे, 8 ऑगस्टपर्यंत दोन्ही बाजूंना उत्तर द्यायचं होतं. पण सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण होईपर्यंत आयोगाच्या नोटिशीला स्थगिती द्या अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे.
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षात काल पुण्यातल्या कात्रजमध्ये रस्त्यावरच्या राड्याची ठिणगी पडली. शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल हल्ला करण्यात आला. पुण्याच्या कात्रज परिसरात ही घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुणे दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते. त्यासाठी उदय सामंतही दगडूशेठच्या मंदिराच्या दिशेनं जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंतांना इजा झालेली नाही, पण त्यांच्या गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी विस्तारित पीठाकडे की, घटनापीठाकडे जाणार? किंवा निवडणूक आयोगाच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सुनावणीत मिळणार आहेत. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. दोन्ही बाजूंना 27 जुलैपर्यंत आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालय आज करणार आहे.
मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. 27 जुलैपर्यंत दोन्ही बाजूंना आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की, नाही याचा विचार सुप्रीम कोर्ट आज करणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाबाबत कोणते मुद्दे सर्वोच्च न्यायालय विचारात घेणार?
1. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी
2. गटनेता, व्हिप म्हणून विधानसभा, लोकसभेत शिंदे गटाने केलेल्या नेमणुका अवैध ठरवण्याची मागणी
3. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव वैध की अवैध याचाही निर्णय कोर्टाला करावा लागेल
4. सोबतच निवडणूक आयोगातही ही लढाई पोहोचली आहे, 8 ऑगस्टपर्यंत दोन्ही बाजूंना उत्तर द्यायचं होतं. पण सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण होईपर्यंत आयोगाच्या नोटिशीला स्थगिती द्या अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. महाराष्ट्रात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला नेमका कधी मुहूर्त मिळतो हेही यावर ठरेल. उद्धव ठाकरे गटाच्या मागण्या मान्य करणं म्हणजे लोकशाहीचा अवमान, अल्पसंख्याकांची अराजकता होईल, असा दावा शिंदे गटानं आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. 15 आमदार, 39 आमदारांनी घेतलेल्या निर्णयाला अवैध कसे ठरवू शकतात हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय आयोगाला आपलं काम करु द्यावं, अस म्हणत एकप्रकारे त्यांनी शिवसेना खरी कुणाची हा निकाल लवकर लागावा असंही अपील केलं आहे.
घटनात्मक पीठाकडे हे प्रकरण गेलं तर साहजिक ही प्रक्रिया दीर्घकाळ चालेल. सोबत आमदारांच्या अपात्रतेबाबत जैसे थे परिस्थिती अजूनही कायम आहे. त्यााबाबत सुप्रीम कोर्ट काही निर्णय देतं का हे पाहावं लागेल. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय होतं याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -