लातूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत खातं उघडलं आहे. आम आदमी पक्षानं मराठवाड्यात व्हाया लातूर आपलं खातं उघडलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत 'आप'चे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत. लातूर जिल्ह्याचे आपचे जिल्ह्याध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात 'आप' दापक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागांवर ताबा मिळवत ही ग्रामपंचायत खेचून आणली आहे.


विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी मराठीत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा. आपचे अजिंक्य शिंदे यांनी या विजयासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. त्याला रीट्विट करत केजरीवालांनी मराठीत ट्वीट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे.





 निकालानंतर 1 महिन्याच्या आत सरपंचपदाचे आरक्षण-  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ


ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार असल्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता. आज निवडणूक निकालानंतर 1 महिन्याच्या आत सरपंचपदाचे आरक्षण काढणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत असणार आहे. बोगस दाखले काढून निवडणूक लढवली जात होती, आता तसं होणार नाही, असं देखील मुश्रीफ म्हणाले. यामुळे मतदानाची आकडेवारीसुद्धा वाढली आहे, 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे, असंही ते म्हणाले.


हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वात जास्त ग्रामपंचायत जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीचा कारभार नागरिकांना आवडला आहे हे स्पष्ट दिसतंय. चंद्रकांत पाटील यांच्या खानापुरात शिवसेनेनं बाजी मारली आहे. भाजपच्या अनेक दिगग्ज नेत्यांच्या गावात पराभवाचा सामना करावा लागला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.


Gram Panchayat Election : निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या सोडतीचा निर्णय, ग्रामविकास मंत्र्यांना कोर्टाची नोटीस


कोरोना नियमांचे पालन करुन ग्रामसभा पुर्ववत सुरु करा
सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ म्हणाले की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या कलम 7 नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे. अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच, आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करणेची तरतूद आहे. तथापी, कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश, अधिसूचना यानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली होती. तथापी, सद्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.



संबंधित बातम्या
Gram Panchayat Election Results 2021 | हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय


Gram Panchayat Election Results | अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटीलच 'दादा', माळशिरसमध्येही 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर वर्चस्व


Maharashtra Gram Panchayat Election Results | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजय


औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर


Gram Panchayat Election Result : विजयानंतर गुलाल उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप