अहमदनगर: सगळ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या हिवरे बाजारच्या निवडणुकीत पोपटराव पवारांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलने सर्व सातही जागा जिंकल्या आहेत. नेहमी बिनविरोध निवडणुका होत असलेल्या या गावात तब्बल 30 वर्षांनी निवडणूक लागली होती.


गेल्या 30 वर्षामध्ये प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा आणि गावकऱ्यांच्या श्रमदानाचा हा विजय असल्याचे पोपटराव पवार यांच्या पुतण्याने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गेल्या 30 वर्षाच्या बिनविरोध निवडणुकांची परंपरा काही लोकांच्या हट्टामुळे खंडीत झाली असली तरी लोकांनी पोपटराव पवारांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचंही त्यांनी सांगितलं.


पोपटराव पवार यांना 282 मते मिळाली आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना 44 मते मिळाली आहेत. हिवरेबाजारल वार्ड क्रमांक एक मध्ये आदर्श ग्रामविकास पॅनलचे विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर हे उमेदवार विजयी झाले. तर वार्ड क्रमांक दोन मधून रोहिदास पादिर आणि आदीनाथ पवार हे विजयी झाले.


ऐतिहासिक अशी असणारी ही निवडणुक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करण्यात आले होते पण ही निवडणुक लादण्यात आली. पोपटराव पवाराच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार हे मोठ्या फरकाने निवडूण आल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.


Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Live Updates | ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल, अपडेट्ससाठी क्लिक करा


ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.