Omicron Variant : राज्यात आज 50 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद, एकूण संख्या 510
Omicron Variant : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमयाक्रॉन व्हेरियंटने राज्याची चिंता वाढवली आहे.
Omicron Variant : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमयाक्रॉन व्हेरियंटने राज्याची चिंता वाढवली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकेडवारीनुसार, राज्यात आज 50 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुले राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 510 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तसेच आतापर्यंत 193 रुग्णांनी ओमायाक्रॉनवर मात केली आहे.
राज्यात आज 50 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्णाचे रिपोर्ट आले आहेत. त्यापैकी 38 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर 12 रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत. पुणे मनपामध्ये आज 36 रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवड मनपा येथे आठ रुग्णाची नोंद झाली आहे. तर पुणे ग्रामीणमध्ये दोन रुग्णांची नोद झाली आहे. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 510 वर पोहचली आहे.
राज्यात कुठे किती रुग्ण?
अ.क्र. |
जिल्हा /मनपा |
आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ |
मुंबई |
३२८* |
२ |
पुणे मनपा |
४९ |
३ |
पिंपरी चिंचवड |
३६ |
४ |
पुणे ग्रामीण |
२३ |
५ |
ठाणे मनपा |
१३ |
६ |
नवी मुंबई, पनवेल |
प्रत्येकी ८ |
७ |
कल्याण डोंबिवली |
७ |
८ |
नागपूर आणि सातारा |
प्रत्येकी ६ |
९ |
उस्मानाबाद |
५ |
१० |
वसई विरार |
४ |
११ |
नांदेड |
३ |
१२ |
औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली |
प्रत्येकी २ |
१३ |
लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर |
प्रत्येकी १ |
|
एकूण |
५१० |
ओमायक्रॉनच्या 510 रुग्णापैकी यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी एक रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. सात रुग्ण ठाणे आणि चार रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर नऊ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २२८४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १३४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.