(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nurse Strike : परिचारिकांचा संप मागे, येत्या तीन महिन्यात सर्व प्रश्न सोडवण्याचं सरकारचं आश्वासन
राज्याचे वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी आज परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.
मुंबई: महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वात गेल्या आठ दिवसांपासून असलेला राज्यभरातील हजारो परिचारिकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आली.
राज्यभरातील हजारो परिचारिकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 23 मे पासून संप पुकारला होता. आज झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला. आजच्या बैठकीमध्ये मुख्य मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
परिचारिकांचा संप सोडवण्यासाठी प्रयत्न करू: राजेश टोपे
विविध मागण्यांसाठी राज्य परिचारिका संघटनांनी राज्यात अनेक ठिकाणी संप पुकारला होता. त्यावर राजेश टोपे म्हणाले, परिचारिका संपावर आहे. आयुक्त आणि उपायुक्त यांच्याशी मी लगेचच बोलणार आहे. संप सोडवण्यासाठी प्रयत्न करू. त्यांच्या रास्त मागण्यांचा आम्ही विचार करू आणि मागण्या मान्य करु असे टोपे म्हणाले.
राज्यात 23 ते 25 मे दरम्यान परिचारिकांकडून शांततापूर्ण आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली. याची दखल न घेतल्यामुळे 26 ते 27 मे 2022 पर्यंत राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरु करण्यात आलं.त्यानंतर राज्य सरकारने चर्चेसाठी वेळ न दिल्याने संपूर्ण राज्यात 28 मे 2022 पासून अनिश्चितकालीन संप सुरु करण्यात आला होता. आज हा संप अखेर मागे घेण्यात आला.
काय आहेत परिचारिकांच्या मागण्या?
आरोग्य सेवेत परिचारिकांची नियमित भरती करण्यात यावी.
जुनी पेन्शन लागू करण्यात यावी.
केंद्र सरकार प्रमाणेच नर्सिंग भत्ता देण्यात यावा.
आरोग्य सेवेचे खाजगीकरण करु नये.
प्रशासकीय बदली रद्द करुन विनंती बद्दली करण्यात यावी.
संबंधित बातमी: