Sharad Pawar on Ketaki Chitale : शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं आहे. केतकी चितळेला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं विकृती, सर्वपक्षीयांकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आक्रमक भूमीका घेण्यात आली आहे. दरम्यान केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केतकीला मी ओळखत नसल्याचे पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, केतकीला ओळखत नाही आणि त्या पोस्टबद्दलही माहिती नाही. मला काहीही ठाऊक नाही. कोणत्या व्यक्तीने टीका केली आणि ती व्यक्ती काय बोलली, हे मला माहिती नाही. संबंधित व्यक्ती नेमकं काय बोलली, हे जाणून घेतल्याशिवाय मी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.
गेल्या काही दिवसांत माझ्याविरोधात होणाऱ्या तक्रारी वाचनात आल्या. मी एका काव्याचा उल्लेख केला होता. मात्र, त्यानंतर वेगळं चित्र मांडण्यात आले. ते वास्तव नव्हते, असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवारांबाबत जे काही लिहिलं, बोललं गेलं ती विकृती आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. तसेचचांगल्या दवाखान्यात नेऊन केतकीला उपचार द्यायला हवेत, अशी टीका अजित पवारांनी या वेळी आहे.
संबंधित बातम्या :
Raj Thackeray : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावले, म्हणाले...
Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन