एक्स्प्लोर

Nashik Surgana Flood : सुरगाण्यातील विद्यार्थ्यांचा भर पुरातून शाळेचा प्रवास, प्रशासन जागे कधी होणार? 

Nashik Surgana Flood : सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) सावरपाडा येथील केटी बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून (Flood) शाळेचा प्रवास करावा लागत आहे.

Nashik Surgana Flood : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील आजही अनेक भागात पु परिस्थिती जैसे थे आहे. मात्र अनेक भागात नदीवर पुलंचं नसल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) सावरपाडा येथील केटी बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव समोर आले आहे. 

एकीकडे सुरगाणा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली. पहिल्याच पावसात रस्ते खचले, पूल पाण्याखाली गेली, अनेक गावांचा संपर्क तुटला, अलंगुन गावात पुराचे पाणी आले. यामुळे अनके भागात आजही पुरपरिस्थिती असून नागरिकांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी केटीवेअर प्रवास करावा लागत आहे.सध्या या केटीवरून पुराचे पाणी जात असताना अशा प्रकारचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. 

सुरगाणा तालुका निसर्ग सौंर्दयाने बहरून गेलेला परिसर. मात्र या निसर्ग सौंदर्यामागे येथील नागरिकांच्या पायाभूत सुविधा कुठेच दिसत नाही. आजही रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधांची या ठिकाणी वाणवा आहे. म्हणजे अनेकदा रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका तर नाहीच नाही मात्र रस्ते नसल्याने डोली करून दवाखान्यात न्यावे लागते. पावसाळयात रस्ते नसल्याने पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. तर कधी रस्ते खचल्याने संपर्कच तुटतो. यंदाच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटनेस समोर आल्या. यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुढे आला. एकूणच तालुक्यातील पायाभूत सुविधांची परिस्थिती अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. 

दरम्यान सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा परिसरात नागरिकांसह विद्यार्थ्यांना केटीवरून ये जा करावी लागत आहे. या ठिकाणी कळमणे, भेगू,  सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी अशी गावे असून यांचा इतर गावांशी सपंर्क तुटला आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जा ये करण्यासाठी पूल होणे आवश्यक आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधण्यात यावा तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रशासन जागे कधी होणार? 
यंदाच्या पावसाळ्यात सुरगाणा तालुक्यातील अत्यंत भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेक भागात पूर आल्याने संपर्क तुटला, आरोग्य व्यवस्था खोळंबली. पिण्याचे पाण्याची तीन तेरा वाजले. आता शाळा सुरु झाली तर विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी पुलंचं नाही. जीवघेणी कसरत करून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांसह नागरिकांवर आली आहे. त्यामुळे संबंधित तालुका, जिल्हा प्रशासन पायाभूत सुविधांसाठी नेमकं काय करतंय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे. शिवाय अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्याशिवाय स्थानिक पातळीवर कामे करतात का? असाही प्रश्न या निमित्ताने होतो आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget