एक्स्प्लोर

Nashik Police : देवदूत ठरणाऱ्या पोलिसांवरच दुर्दैवी वेळ, नाशिकमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःला संपवलं!

Nashik Police : अनेकदा सामान्य माणसांच्या मदतीला धावून येणाऱ्या पोलिसांवरच स्वतःला संपवण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

Nashik Police : नाशिक शहरात (Nashik) आत्महत्यांचे सत्र (Suicide) काही कमी होताना दिसत नाही. तरुण तरुणींसह ज्येष्ठ नागरिक आदी लोक टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशातच नागरिकांची सुरक्षा ज्यांच्या हातात असते, त्या पोलीस प्रशासनातील कर्मचारी देखील आत्महत्या करत असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरात मागील दोन दिवसात दोन पोलिसांनी स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. 

नाशिक शहरातील (Nashik) मसरुळ पोलीस ठाण्यात कार्यरत (Mhasrul Police Station) असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेला दोन दिवस उलटलेले नाहीत, तोच आता आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्यांचे कारण समोर आलेलं नाही. शिवराम भाऊराव निकम असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर काल रात्री मनोज बोरसे या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःला संपवले आहे. या घटनेने पोलीस कुटुंबांसह पोलीस प्रशासनात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आजारपणामुळे आयुष्य संपवल्याची चर्चा

दरम्यान म्हसरुळ पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक उपनिरीक्षक निकम हे आजारपणामुळे काही दिवसांपासून रजेवर होते. कर्तव्यावर हजर होण्याच्या एक दिवस आधीच त्यांनी आत्महत्या केली. निकम यांनी पोलीस आयुक्तालयातील (Nashik CP office)  पंचवटी, सरकारवाडा, वाहतूक, विशेष शाखेत सेवा बजावली होती. काही महिन्यांपासून ते म्हसरुळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. निकम हे आजारपणामुळे काही दिवसांपासून रजेवर होते. ड्युटीवर हजर होण्यापूर्वीच त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पोलीस तपासात आजारपणामुळे निकम यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.

ड्युटीवर असताना पोलिसाची आत्महत्या

तर दुसरी घटना पोलीस आयुक्तालयात घडली आहे. तोरणमाळ येथील पोलीस कर्मचारी मोहन बोरसे हे दोन वर्षांपूर्वी नाशिक शहरात दाखल झाले होते. शहर पोलीस आयुक्तालयात मोटार वाहन विभागात कार्यरत होते. काल रात्री नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले. मात्र सकाळी पोलीस कर्मचारी गेले असता बोरसे यांनी शेडमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आज सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मात्र बोरसे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. शहरात बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती आणि आज पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळ हादरले आहे. दरम्यान अशा पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणे दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget