Nashik MNS : नाशिकमधील चित्रपटगृहांना मनसेने बजावली नोटीस, प्रदर्शन थांबविल्यास कोर्टात जाणार
Nashik MNS : हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्याने मनसे (MNS) ने नाशिकच्या चार मल्टिप्लेक्सला (Theaters) कायदेशीर नोटीस बजावली आहे.
Nashik MNS : हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्याने मनसे (MNS) विधी विभागाने नाशिकच्या चार मल्टिप्लेक्सला (Theaters) कायदेशीर नोटीस (Notice) बजावली आहे. शिवाय पुन्हा प्रदर्शन थांबवल्यास मनसे न्यायालयात धाव घेणार असल्याचे माहिती मनसेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. नाशिक शहरातील चार चित्रपटगृहांना नोटीस बजावण्यात आली आहे.
दोन दिवसांपासुन हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात (Vedat Marathe Veer Daudale Sat) या दोन्ही मराठी चित्रपटांवर राजकीय वातावरण तापले आहे. याचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटले आहेत. काल राष्ट्रवादीच्या वतीने हर हर महादेवचे शो न दाखवण्याचे साठी निवेदन देण्यात आले होते, तर त्याच सुमारास मनसेकडून हर हर महादेवचे शो सुरु करण्याचे निवेदन चालकांना देण्यात आले होते. त्यानंतर आज मनसेच्या मागणीला यश आले असून शहरात दोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मनसे विधी विभागाकडून शो सुरु ठेवण्यासाठी चार चित्रपटगृहांना लीगल नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर शो रद्द केल्यास थिएटर चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान विधी विभागाने दिलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित मराठी चित्रपट 'हर हर महादेव' 25 ऑक्टोबरला सर्वत्र महाराष्ट्रमध्ये प्रदर्शित झाला आहे. सदर चित्रपट मराठी माणसाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असून राजकीय पक्ष व इतर काही संघटना मराठी माणसाच्या असलेला चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तरी चित्रपटगृहे शो बंद ठेवून नागरिकांचा संविधानिक हक्क हिरावून घेण्यात प्रयत्न करत आहे. सदरच्या चित्रपटास भारतीय सेन्सर बोर्डाने सर्व तपासाअंती चित्रपट प्रसारित करण्याबाबत प्रमाण पत्र दिलेले आहे. राजकीय पक्ष राजकारण करत असून त्या राजकारणाला बळी पडून नाशिकचे सर्व चित्रपटगृहामध्ये प्रसारित करण्यापासून मज्जाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आल्याचे मनू द करण्यात आले आहे.
तसेच पुढे असे नमुद करण्यात आले कि, नाशिक शहरातील अनेक नागरिक चित्रपट पाहण्यापासून वंचित राहिले आहेत. चित्रपटामध्ये आक्षेपार्य काही असेल तर भारतीय सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतला असता, परंतु मराठी चित्रपट 'हर हर महादेव' भारतीय सेन्सर बोर्डाने प्रमाणपत्र देऊन चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे. चित्रपटामध्ये काही आक्षेपार्य काही असेल तर राजकीय संघटना भारतीय सेन्सर बोर्डाशी संपर्क साधु शकता. परंतु नाशिकच्या चित्रपटगृहांनी चित्रपट बंद करण्याचा राजकीय दवाबा पोटी अधिकार नाही. सर्व नागरिकांच्या वतीने, नोटीस मिळाल्यापासून 02 दिवसाच्या आंत सदरील मराठी चित्रपट "हर हर महादेव" जर पुन्हा नागरिकांच्या मागणीनुसार प्रदर्शित केला नाही तर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, त्याचबरोबर ग्राहकांचा हक्क भंग झाल्या प्रकरणी नाशिक ग्राहक हक्क मंचाकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे.