Marathwada: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असतानाच, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सात महिन्यात म्हणजेच 206 दिवसांत मराठवाड्यातील तब्बल 515 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. ज्यात सर्वाधिक 153 शेतकरी बीड जिल्ह्यातील आहे. म्हणजेच मराठवाड्यात रोज दोन पेक्षा जास्त शेतकरी आपलं जीवन संपवत आहे. 

शेतकरी आत्महत्या ( 01 जानेवारी 2022 ते 25 जुलै 2022 )

जिल्हा  एकूण प्रकरण  पात्र  अपात्र  चौकशीसाठी प्रलंबित  मदत देण्यात आलेली रक्कम (लाखात)
औरंगाबाद 83 68 05 10 68
जालना 60 46 09 05 46
परभणी 42 28 06 08 28
हिंगोली  17 15 01 01 15
नांदेड  64 50 07 07 46
बीड  153 104 27 22 104
लातूर  33 29 03 01 24
उस्मानाबाद  63 46 05 12 46
एकूण  515 386 63 66 377

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मराठवाड्यातील 3 हजार 640 गावांना फटका बसला आहे. तर पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला आहे. प्रशासनाकडून सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे करण्यात आले असले तरीही अजूनही अडीच लाख हेक्टरचे पंचनामे बाकी आहे. तर मराठवाड्यातील एकूण 6 लाख 21 हजार शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे.  

महत्वाच्या बातम्या...

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसामुळं आत्तापर्यंत 45 जणांचा मृत्यू, तर 3 लाख 78 हजार 866 हेक्टरवरील पिकांचं नुकसान

मराठवाड्यातील 3 हजार 640 गावांना अतिवृष्टीचा फटका; पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल