Marathwada Rain : सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसानं (Hevay Rain) धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा (Marathwada )आणि विदर्भाला (vidarbha)  या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अतिवृष्टी, पूर आणि वीज पडल्याच्या घटनांमध्ये मराठवाड्यात आत्तापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानं याबाबतची माहिती दिली आहे. तर या पावसामुळं शेतीच्या पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत.


मराठवाड्यात पुरामुळं आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वीज पडून 25 जणांचा मृत्यू झाला असून  भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. एकूण आत्तापर्यंत मराठवाड्यात 45 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अतिवृष्टीमुळे आतापर्यंत लहान मोठ्या अशा 449 जनावरांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधार पावसामुळं शेतीच्या पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. आत्तापर्यंत मराठवाड्या 3 लाख 78 हजार 866 हेक्टर जमिनीवरील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. तर 2 लाख 34 हजार 809 शेतकरी या पावसामुळं बाधित झाले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयानं याबाबतची माहिती दिली आहे.


राज्यात 8 लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांना मोठा फटका  


जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसानं राज्यातील अनेक जिल्ह्याला जलमय केले आहे. अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यात 8 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नांदेड, हिंगोली, बुलढाण्यात आदी जिल्ह्यांत अतिवृष्टी व त्यानंतर उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: