दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1.  उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शक्तीप्रदर्शन करत बंडखोरांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता, राज्यभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन, ठाकरेंनी केली होती निष्ठेच्या शपथपत्राची मागणी


2. उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव यांच्या घटस्फोटीत पत्नी स्मिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या, मात्र सदिच्छा भेट असल्याची स्मिता यांची माहिती


3. 'भाजपवाल्यांनो सावधान! उद्या हे स्वत:ला नरेंद्र मोदी समजून पंतप्रधानपदावर दावा सांगतील'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला


Uddhav Thackeray Interview by Sanjay Raut : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सामनामधील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, 'प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान... उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे.


4. पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराशिवाय फक्त शिंदे-फडणवीसांची राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत, ठाकरेंना नवा धक्का मिळण्याची शक्यता


5. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक, नव्या सरकारला 9 ऑगस्टपर्यंतचं अल्टिमेटम, अन्यथा उठाव करण्याचा इशारा


6. पुढचे तीन दिवस पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज काळ बनून कोसळली, एकूण 28 जणांचा मृत्यू


7.अजित पवार उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र


8.पावसाळी अधिवेशनात आजही गोंधळाची शक्यता; खासदारांच्या निलंबनांमुळे विरोधक आक्रमक


9. अकोल्यात रेल्वेसह भाजप खासदाराचं घरं बॉम्बने उडवण्याची धमकी;  कॉल 'फेक' असल्याची अकोला पोलिसांची माहिती


10. अनेक राजकीय नेते, बड्या उद्योजकांना तुरुंगवास घडवणाऱ्या PMLA कायद्याचं आज भवितव्य ठरणार, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष