Nashik Trimbakehswer Darshan : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer)राजाच्या दर्शनासाठी आता नव्याने उभारण्यात आलेली दर्शन बारी सज्ज झाली असून भविकांना त्र्यंबक जोतिर्लिंगांचे (Trimbakeshwer Jyotirling) दर्शन घेणे सुलभ होणार आहे.  भाविकांसाठी नवी दर्शनबारी हि एसीने परिपूर्ण असल्याने दर्शन सुखद होणार आहे. 


बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे कोरोनानंतर (Corona) भाविकांच्या गर्दीत कमालीची वाढ झाली आहे. त्यातच आता दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्रावण मासात हि गर्दी अधिकच फुलून येणार आहे. यासाठी देवस्थानच्या माध्यमातून नव्या दर्शनबारी खुली करण्यात आली आहे. दरवर्षीं श्रावणात भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होते. कोरोना काळात दोन वर्ष मंदिर बंद, प्रदक्षिणा मार्ग बंद यामुळे भाविकांची त्रयंबकककडे पाठ होती. मात्र आता पुन्हा एकदा भाविकांची पाऊले त्र्यंबककडे वळू लागली आहेत. 


देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होत असतात. यासाठी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थानच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही नियोजन करण्यात येत आहे. यासाठी सात कोटी रुपये खर्च करून नवी दर्शनबारी बांधण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना मंदिराच्या बाहेर उभे राहता थेट मंदिरात रांगेत राहून शिस्तीने दर्शन घेता येणार आहे. काही दिवसांत श्रावण सुरु होणार असल्याने श्रावणात शिवपुजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे श्रावणात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. भाविक पूजा आटोपल्यानंतर तसेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर त्र्यंबकराज दर्शन साठी येतात. 


दरम्यान त्र्यंबक येथील पूजा आटोपल्यानंतर भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनसाठी गर्भगृहात प्रवेश मिळेपर्यंत मंदिराच्या आवारात भाविकांना उभे राहावे लागते. या भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने त्र्यंबकेश्वर मंदिरात वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे हजारो भावी या ठिकाणी दर्शनासाठी उभे राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आले आहे. सात कोटी रुपये दर्शनबारीसाठी खर्च करण्यात आले असून भारतातील अशा पद्धतीची ही पहिली दर्शन बारी आहे. 


एसी दर्शनबारी 
सात कोटी रुपये दर्शनबारीसाठी खर्च करण्यात आले असून भारतातील अशा पद्धतीची ही पहिली दर्शन बारी आहे. दर्शन रांगेत जेष्ठ मंडळींना बसण्यासाठी तर सभामंडप तर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे. याशिवाय स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सुविधांमुळे भाविकांची गैरसोयी टळले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रावणात या ठिकाणी होणारी गर्दी पाहता नियोजन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.