Maharashtra News LIVE Updates : आज कोकणातील मराठा समाजाचा भव्य मेळावा, हजारो मराठे एकवटणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Parbhani News : उसाला 2700 रुपये भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीने परभणी गंगाखेड महामार्गावरील सिंगणापूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले जवळपास दोन तास हा रास्ता रोको चालला यामुळे परभणी गंगाखेड महामार्ग तसेच पूर्णा-परभणी महामार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.राजू शेट्टी आणि कारखानदार यांच्यात बैठक झाली यात 2500 ऐवजी 2700 रुपये भाव देण्याचे मान्य करण्यात आल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले.
MAHARERA : मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांना एकापेक्षा जास्त महारेरा (MAHARERA) नोंदणीक्रमांकामुळे घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेरानं नुकताच एक निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश महारेरानं जारी करुन तातडीनं लागू केले आहेत. दरम्यान, गृहनिर्माण प्रकल्पांना एकापेक्षा जास्त महारेरा नोंदणीक्रमांकामुळे घर खरेदीदारांची होऊ शकणारी फसवणूक टाळण्यासाठी महारेरानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
El Nino Monsoon Update : आगामी मान्सून हंगामाच्या आधी महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर येण्याचे संकेत अमेरिकी हवामान शास्त्र संस्था नोआने दिले आहेत. आगामी मान्सून हंगामासाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे. एल निनोची शक्यता नसल्याने पाऊस सर्वसाधारण राहील असा अंदाज आहे.
Sachin Kharat on Sushilkumar Shinde : काँग्रेस पक्षाचे नेते सुशीलकुमार शिंदे बोलताना म्हणाले प्रणिती शिंदे आणि मला भाजपची दोन वेळा ऑफर, परंतु सुशील कुमार शिंदे यांनी मध्यंतरी म्हणाले ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे त्यांनी आरक्षण सोडावे, परंतु त्याच राखीव मतदारसंघांमधून त्यांना आता निवडून यायचे आहे, म्हणून स्वतःचे महत्त्व वाढवण्याकरता आणि पराभव दिसू लागल्यामुळे मला आणि माझ्या मुलीला भाजपने दोन वेळा ऑफर दिले असे विधान केल्याचे दिसत आहे, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष म्हणून महायुतीला मागणी करत आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव आहे आणि माझा आरपीआय सचिन खरात गट पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजितदादा पवार) मित्र पक्ष आहे त्यामुळे महायुतीची उमेदवारी आरपीआय खरात पक्षाला म्हणजेच मला द्यावी अशी मागणी करत आहे.
Maratha Reservation : जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही, मराठ्यांनी सुद्धा आता त्यांच्याकडून अपेक्षा सोडावी असे जरांगे म्हणाले. तर, पंतप्रधान मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही, आम्ही लढून आरक्षण मिळवणार असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहेत.
Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिंदे गटानं ठाकरेंच्या आमदारांविरोधात 13 याचिका दाखल केल्या होत्या, या 13 याचिकांवर आज तातडीची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयानं सर्व प्रतिवाद्यांना नोटीस धाडली असून 8 फेब्रुवारीपर्यंत याचिकांवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, याप्रकरणाची पुढची सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Mumbai News : मुंबईतील (Mumbai News) एका आलिशान रेस्टॉरंटच्या पदार्थात मृत उंदीर सापडल्याचा दावा पीडित व्यक्तीनं केला आहे. यामुळे व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. ही व्यक्ती 75 तास रुग्णालयातच होती.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मालेगाव : लोकसभेची रणधुमाळी उंबरठयावर असतांना धुळे लोकसभा मतदार संघात विविध पक्षीय हालचाली सुरू झाल्या असून धुळे लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला ( शरद पवार गट ) सोडावा अशी मागणी, मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे. गेल्या तीन टर्म मध्ये कांग्रेस पक्षाला यश न आल्याने यावेळी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला उमेदवारी मिळावी, अशी मागणी करतानाच धुळे मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाचा सर्व्हे करून तो सर्व्हे राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांचेपुढे ठेवणार असल्याचेही श्री.शेख यांनी सांगितले. भाजप पुढे जर आव्हान द्यायचे असेल तर, राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी मिळणे गरजेचे आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादीने सांगितल्यास मी स्वतः ही उमेदवारी करण्यास तयार आहे, किंवा पक्षाने ज्याला उमेदवारी दिली त्यामागेही भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.
Ayodhya Ram Mandir : कोल्हापूरचा 'हरे कृष्ण ग्रुप' राम जन्मभूमी अयोध्येच्या रस्त्या-रस्त्यांवर भव्य रांगोळी साकारतोय. महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून आलेले हरे कृष्ण ग्रुपमधील कलाकार अयोध्येतील रस्त्यांवर विविध ठिकाणी रांगोळी साकारत आहेत. एकीकडे महिलांची कलश यात्रा निघाली आहे तर, दुसरीकडे हे कलाकार या कलश यात्रेचा स्वागत करत रस्त्यांवर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मोठमोठ्या रांगोळ्या साकारत आहेत. साधारणपणे एक ते दीड तासात त्यांनी वीस ते पंचवीस रांगोळ्या साकारल्या. पुढे सुद्धा विविध कार्यक्रमात या ग्रुपकडून अशा रांगोळ्या साकारल्या जातील.
Solapur : सोलापूर : सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर आल्याची माहिती समोर आली आहे. सुशील कुमार शिंदे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'माझा दोन वेळा पराभव झाला असला तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून ऑफर असल्याचा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र पुढे बोलताना काँग्रेस आमच्या रक्तात आहे, आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असे स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं की, ''माझा दोन वेळा पराभव झालेला असताना प्रणिती किंवा मला भाजपमध्ये या म्हणतात. पण आता ते कसे शक्य आहे. ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो, जिथे आमचं बालपण, तारुण्य गेलं. आता मी 83 वर्षाचा आहे, त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे, असं कसं म्हणणार. आणि तुम्हाला माहिती आहे प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असं होतं राहतं, पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं (पराभव) झालं. त्या पराभवाबाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते, लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो, पुन्हा उठतो. मग तो चालायला लागतो आणि जेव्हा चालायला लागतो, तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही. हे उदाहरण एवढ्याकरता आहे की, माणसाला त्रास होतो पण पुन्हा शक्ती मिळते. तुम्ही काहीही काळजी करू नका. आज वाईट दिवस आहेत मात्र ते दिवस निघून जातील. आपल्याला पुन्हा वैभवाचे दिवस येतील याविषयी माझ्या मनामध्ये खात्री आहे.''
Chiplun News : चिपळूणमध्ये आज कोकणातील मराठा समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुंबईसह रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील मराठा समाजाचा चिपळूणमध्ये एल्गार पाहायला मिळत आहे. 'मराठा म्हणूनच आरक्षण द्या ' या प्रमुख मागणीसह विविध मागण्या घेऊन मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्या मुंबईतील सभेच्या आधी कोकणात होणाऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. सरसकट कुणबी प्रमाण देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीला कोकणातील मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे. चार हजाराहून अधिक मराठा बांधव चिपळूणमध्ये एकवटण्याची शक्यता आङे.
Chiplun News : चिपळूणमध्ये आज कोकणातील मराठा समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुंबईसह रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील मराठा समाजाचा चिपळूणमध्ये एल्गार पाहायला मिळत आहे. 'मराठा म्हणूनच आरक्षण द्या ' या प्रमुख मागणीसह विविध मागण्या घेऊन मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्या मुंबईतील सभेच्या आधी कोकणात होणाऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. सरसकट कुणबी प्रमाण देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीला कोकणातील मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे. चार हजाराहून अधिक मराठा बांधव चिपळूणमध्ये एकवटण्याची शक्यता आङे.
अमरावती : भारतीय संस्कृतीत कुंकू लावण्याची प्रथा आहे. कपाळावर गंध, टिळा लावणे ही परंपरा स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही सामान्य असली तरी कुंकू लावणे हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. कुंकू तयार करणारे शहर म्हणून अमरावतीची खास ओळख आहे. अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येऊन ठेपलेला असताना अमरावतीहून अयोध्येसाठी पाचशे किलो कुंकू पाठवले जाणार आहे.
'सकल हिंदू समाज'ने कुंकू पाठवण्याचा संकल्प केला असून आज 17 जानेवारी रोजी हे कुंकू अयोध्येसाठी रवाना करण्यात येणार आहे, अशी माहिती केसरी धर्मसभेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी दिली आहे. श्री राजराजेश्वर माउली यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने 17 जानेवारीला अमरावतीत कुंकू अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अंबानगरीची खास ओळख असलेले 500 किलो कुंकू पाठवण्याचे आम्ही ठरवले आहे. कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर श्री राजराजेश्वर माउली सरकार हे त्यांच्यासोबत प्रतीकात्मक कलशात कुंकू सोबत नेतील. उर्वरित कुंकू रुक्मिणी पीठाचे सेवक अयोध्येत पोहोचवतील.
श्री राजराजेश्वर माउली सरकार यांचा अभिवादन सोहळा आज सायंकाळी 5 वाजता राजकमल चौकात आयोजित करण्यात आला आहे.
Maharashtra News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कराडमध्ये दाखल होत आहेत. आता ते कराडमधील भाजप नेते अतुल भोसले यांनी भरवलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देणार असून तेथील स्टॉललाही भेट देणार आहेत. त्यानंतर ते याच ठिकाणच्या सभेतून ते आपले मत व्यक्त करतील. हे कृषी प्रदर्शन 17 तारखेपासून सुरू झाले असून येत्या 21 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
Jitendra Avhad News : बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायपालिकेत ही आरक्षण द्यायलं हवं होतं, असे वक्तव्य करताना न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमध्ये जातीयतेचा वास येतो, आपल्या कालच्या या वक्तव्यापासून जितेंद्र आव्हाड यांनी आज पूर्णपणे घुमजाव केला आहे. मी असं बोललेलो नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मी कुठे ही न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो असे बोललेलो नाही, तुम्ही चेक करा मी, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
Ahmednagar News : अहमदनगर शहराला आणि बुऱ्हाणनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूला असलेल्या दत्ता खताळ या शेतकऱ्याच्या शेतात जलशुद्धीकरण केंद्राचे अशुद्ध पाणी जात असल्याने त्यांच्या शेतीचे मोठं नुकसान होत आहे. या पाण्यामुळे त्यांच्या तीन एकर क्षेत्रातील उसाचे मोठे नुकसान झाले असून दरवर्षी दोन एकर क्षेत्र पडीक ठेवण्याची वेळ या शेतकऱ्यावर येत आहे. सातत्याने याबाबत महापालिका प्रशासन आणि बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतला कळवून देखील ही पाणी गळती थांबवली जात नसल्याने खताळ यांनी जलशुद्धीकरण केंद्रातून पुढे नगर शहराला पाणीपुरवठा करणारे वीज पंप बंद करण्याचा इशारा दिलाय. यासोबतच उद्यापासून जलशुद्धीकरण केंद्रासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा खताळ यांनी दिलाय.
Dombivali News : डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात पै लायब्ररी, डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 62 हजार 500 पुस्तके रचत राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मंदिर संपूर्ण उभं करायला 30 दिवस लागले असून मंदिर 50 फूट उंच 80 फूट रुंद 40 फूट लांबी आहे. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे कलश पूजन करण्यात आले. 19 तारखेला या प्रतिकृतीचे काम पूर्ण होणार असून नागरिकांना पाहण्यासाठी खुली होणार आहे. या क्रीडा संकुलाच्या आवारात 19 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान पै लायब्ररीच्या माध्यमातून बहुभाषिक पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक यावर आधारित हे प्रदर्शनात असून या कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचे विविध विषयांवर मार्गदर्शन देखील रसिकांना लाभणार आहे.
Thane Mumbra Fire : मुंब्रा बायपास रोड या ठिकाणी रात्री 11 वाजता एका पान शॉप टपरीला आग लागली होती. या घटनास्थळी मुंब्रा पोलीस कर्मचारी, टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान 1- फायर वाहन, 1-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. या घटनेत कोणालाही दुखापत नाही. आग लागलेली पान शॉप टपरी पूर्णतः जळाल्याने नुकसान झाले आहे. या घटनास्थळी पान शॉप टपरीला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी 11.50 वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविली आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून.कोणालाही दुखापत नाही.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा (NCP) शरद पवारांनी श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र लिहिले आहे. राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवारांनी श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीस चंपत राय यांचे आभार मानले आहे. तसेच 22 जानेवारीनंतर रामलल्लाचं दर्शन घेणार आहे. तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झालं असेल, असा उल्लेख पत्रात केला आहे.
Shiv Sena MLA Disqualification Case Update : आज मुंबई उच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला शिंदे गटाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात दाखल केलेल्या 13 याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे. शिंदेची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही, तो न मानणाऱ्या ठाकरे गटातील 'त्या' आमदारांना अपात्र करा अशी मागणी आहे. संजय पोतनीस, वैभव नाईक, सुनील राऊत, कैलास पाटील, राजन साळवी, राहुल पाटील, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्फेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर आणि अजय चौधरींविरोधात भरत गोगावलेंकडून याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. आज सकाळच्या सत्रात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Hingoli News : सतत होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात जाणू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते. शेतकरी या हळदीच्या पिकाला वर्षभर जपत असतात, परंतु हेच शेतकरी आता संकटात सापडले आहेत. कारण हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये करपा रोगाच्या प्रादुर्भाव पाहायला मिळतोय, त्यामुळे हळदीचा उत्पादनात 25 ते 50 टक्के पर्यंत घट होऊ शकते, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे.
Chandwad Crime News : नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दुगाव येथील जमीन व्यावसायिक राजू केदु शिंदे यांचा दुगाव शिवारात तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून आला करण्यात आहे. पूर्व वैमनस्यातून आणि मागील भांडणाची कुरापत काढून धारदार तीक्ष्ण हत्याराने राजू शिंदे यांचेवर वार करून जीवे ठार मारण्यात आले आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका इसमावर देखील तीक्ष्ण हत्याराने पाठीत वार करण्यात आले असून तो ही गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या खून प्रकरणात दहा जणांविरोधात चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Malegaon Crime News : मालेगाव शहरातून बारा दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मोहम्मद कैफ या बालकाचा मृतदेह नाशिकच्या चांदवड घाटाजवळ मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. मालेगावच्या आयेशानगर पोलिस ठाण्यात मोहम्मद कैफच्या कुटुंबीयांनी यापूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मालेगाव शहरातून चांदवडपर्यंत हा बालक पोहोचला कसा? आणि त्याचा मृतदेह आढळल्याने या बालकाचा घातपात अथवा खून झाल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आयेशानगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे
Solapur News : सोलापुरातील 3 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी गटनेते तौफिक शेख, माजी नगरसेवक गणेश पुजारी यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झालाय. या सर्वांनी नुकतीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतं प्रवेशासंदर्भात चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली. आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांनी 2019 च्या पालिका निवडणुकीत बसपा कडून निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. तर तौफिक शेख यांनी एमआयएमकडून पालिका निवडणूक लढवलेली होती. आनंद चंदनशिवे आणि तौफिक शेख यांना मानणारा वर्ग मोठा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची धुरा या दोघांनी सांभाळली होती. मात्र लोकसभेतल्या पराभवनंतर या दोघांनी ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सर्वानी आता अजित पवार गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का समजला जातोय. दरम्यान या महिनाअखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येणाची शक्यता आहे. त्यांच्या उपस्थितीत सोलापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये अपघात विभागात तब्बल चार तासाहून अधिक काळ डॉक्टर उपलब्ध नसल्याची तक्रार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्याकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता राजन साळवी यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेत प्रत्यक्ष पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान मेडिकल कॉलेजचे डीन येत नाहीत, तोवर जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका राजन साळवी यांनी घेतली. त्यानंतर मेडिकल कॉलेजचे डीन जिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने दाखल झाले. यावेळी राजन साळवी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. ही परिस्थिती गंभीर असून यामध्ये रुग्णांचे हाल होता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवत असताना मेडिकल कॉलेजच्या डीन यांना देखील धारेवर धरले.
जिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातून रुग्ण येत असतात. अशा वेळेला डॉक्टर उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी नेमकं करायचं तरी काय? असा सवाल राजन साळवी यांनी यावेळी उपस्थित असलेल्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना केला. शिवाय आपण स्वतः यामध्ये लक्ष घालणार असून राज्य शासनाला याबाबत भूमिका घेण्यास भाग पाडू, असा पवित्रा सध्या राजन साळवी यांनी घेतला आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती राजन साळवी यांनी दिली. आपल्या मतदारसंघातील दौरा आटपून राजन साळवी रत्नागिरीकडे आपल्या घरी येत असताना त्यांना जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती कळली, त्यानंतर साळवी यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -