Sharad Pawar : जे धाडस त्या घरच्या भगिनींनी दाखवलं, ते नेत्याला दाखवता आलं नाही; ईडीच्या धाडीवरून मुश्रीफांना टोला

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी ब्युरो Last Updated: 25 Aug 2023 09:11 PM
Sharad Pawar Speech Highlights : शेतकऱ्यांचा अपमान ते मणिपूमधील महिलांवरील अत्याचार; शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Sharad Pawar Speech Highlights : कोल्हापूर येथील स्वाभिमान सभेत बोलताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना पक्षातील बंडखोर नेते आमदार हसन मुश्रीफ यांनाही फटकारले. Read More
Sharad Pawar : जे धाडस त्या घरच्या भगिनींनी दाखवलं, ते नेत्याला दाखवता आलं नाही; ईडीच्या धाडीवरून मुश्रीफांना टोला
Sharad Pawar in Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात बंड झाल्यानंतर शरद पवार यांची ही कोल्हापुरातील पहिलीच सभा होती. या सभेत शरद पवार यांनी बंडखोर नेत्यांना फटकारताना भाजपवरही तोफ डागली. Read More
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात कोकणवासियांचा प्रवास वेगवान होणार; 1 सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून नियमित प्रवासी सेवा
Mumbai to Sindhudurg Flight : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून नियमित विमान सेवा सुरू होणार आहे. Read More
National Film Award : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन. राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरीची परंपरा यंदाही मराठी चित्रपट क्षेत्राने कायम राखली, याचा अभिमान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया.

Nashik : लासलगावला कांदा लिलाव सुरू, तर देवळा बाजार समितीत कांदा लिलाव पडले बंद, नाफेडचे प्रतिनिधी आलेच नाहीत.... 

Nashik News : दोन तीन दिवसांच्या व्यत्ययांनंतर आजपासून पुन्हा जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू झाले आहेत. लासलगाव बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात लिलाव सुरू झाले. मात्र कांद्याची आवक नेहमीपेक्षा आज घटल्याचे पाहायला मिळाले. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 2150 रुपये भाव मिळाला तर जास्तीतजास्त 2400 रुपये मिळाला. मात्र नाफेड आजही कांदा खरेदीत उतरलेच नाही. केंद्र सरकारच्या साशंक धोरणावर शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळाले. तसेच देवळ्यात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा लिलाव बंद  पाडले. तसेच या ठिकाणी देखील नाफेडचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कळवण - देवळा रस्त्यावर ठिय्या मांडला. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन


  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.


 राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक


राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 


विजयदुर्गवर आज साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'


छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.


नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी


कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 


खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक


लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.