Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून पवार कुटुंबातही अंतर पडल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमने-सामने अशी लढत झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणुकीतील राजकीय लढाईनंतर अजित पवार व सुप्रिया सुळे एकत्रितपणे किंवा बोलतानाही दिसून आल्या नाहीत. मात्र, आज बारामतीत दादा-ताई एकत्र आल्याचं पाहायला मिळालं
बारामती तालुक्यातील महावितरण उपकेंद्राच्या उद्घाटनासाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळे आणि एकत्र आले होते. यावेळी, दोन्ही नेत्यांमधील औपचारिका दिसून आली, पण नाते गायब असल्याचं पाहायला मिळालं.
महावितरणकडून उशिरा कार्यक्रमाचे निमंत्रण गेल्याने सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला हजेरी लावली.
अजित पवारांची वाट बघत काही काळ सुप्रिया सुळे उपकेंद्रावरती येऊन थांबल्या होत्या. त्यानंतर अजित पवार आले आणि अजित पवारांनी त्यांना पाहून नमस्कार केला.
अजित पवारांनी रिबील कापून उद्घाटन केलं, त्यावेळी सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवून दादही दिली. पण, दादा व ताईमधील अबोला कायम असल्याचं पाहायला मिळालं.
उपकेंद्राच्या उद्घाटनानंतर सुप्रिया सुळे औरंगाबादच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आणि अजित पवारांनी पुढील कार्यक्रमात आपल्या भाषणाला सुरुवात केल्याचं दिसून आलं.