Maharashtra News Live Updates : कांदा प्रश्नी राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
![Maharashtra News Live Updates : कांदा प्रश्नी राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी Maharashtra News Live Updates : कांदा प्रश्नी राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/cf1a4f70084577db7da2ebe979db13b8169232013353889_original.png)
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
विजयदुर्गवर आज साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी
कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक
लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.
Prasad Lad : माझ्या जीवाला धोका, अनोळखी व्यक्तींकडून पाळत; भाजप नेते प्रसाद लाड यांचे मुख्यमंत्री, पोलिसांना पत्र
Onion : कांदा प्रश्नी राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी
कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नाफेडच्या 13 खरेदी केंद्रांकडून खरेदी सुरू आहे. ही खरेदी केंद्रे वाढविण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना विनंती करण्यात आली आहे. सध्या नाफेडकडून 500 मेट्रिक टन कांदा खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे असलेला उपलब्ध कांदा पाहता या केंद्रांची संख्या वाढवावी अशी विनंती पत्राद्वारे केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यात भीषण दुष्काळाची भीती; मराठवाड्याकडे तर पावसानं फिरवलीये पाठ, बळीराजा संकटात
Dhule News: महापालिका वाहन विभागात इंधन चोरीचा घोटाळा; सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुनिल बैसाने यांचा आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)