Raigad News : कोलाड रेल्वे फाटकावर गोळीबार, सुरक्षा रक्षक जागीच ठार; जिल्ह्यात खळबळ
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Mumbai News : कुर्ला पश्चिम येथील सुभाष नगर मध्ये इमारतीच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला आहे.ही संरक्षक भिंत खाली असलेल्या घरांवर पडून वैष्णवी प्रजापती या 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. रात्री आठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. सुभाष नगर येथील जैन सदन या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागून पाच घरे आहेत.यातील तीन घरांवर रात्री अचानक संरक्षक भिंत कोसळली. मध्यावर असलेल्या प्रजापती कुटुंबाच्या घरावर भिंतीचा मोठा भाग कोसळला. यात वैष्णवी चिरडली गेली आणि जागीच तिचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. वैष्णवीला बाहेर काढून पालिकेच्या राजावाडी रुग्णालय पाठविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Thane News: ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत असणारे कोपीनेश्वर मंदिरात नेहमीच भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. ठाणे शहरातील अति प्राचीन व जागृत देवस्थान समजले जाणारे हेच कोपिनेश्वर मंदिर आहे. आज नागपंचमी आणि अधिक मास संपल्यानंतर पहिला श्रावणी सोमवार निमित्ताने पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
Sambhaji Nagar News: श्रावणी सोमवार निमित्ताने छ. संभाजीनगर ते श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढण्यात आली. .यावेळी भक्तांची मोठी रीघ होती. पदमपुरा भागातील नागरिकांनी ही कावड यात्रा काढली होती. या यात्रेमध्ये भगवान शंकराच्या नामघोषात ही सगळी भक्तमंडळी हरवून गेली होती. .
Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर श्रावणी सोमवारच्या निमित्तानं सजून गेलंय. बारा ज्योतीर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर. त्यामुळे शिवशंभोंच्या दर्शनासाठी भाविकांचा अलोट उत्साह दिसून येतोय. पहाटे गाभाऱ्यात पूजा केल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं. पहाटेपासूनच भाविक बेल-फूलं वाहूूून तसेच दुग्धाभिषेक करून शिवशंकराचं दर्शन घेत आहेत.
Bhimashanakar News: आज श्रावणातला पहिला सोमवार. यानिमित्तानं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केलीय. मंदिराच्या गाभाऱ्यात विधीवत पूजा करुन भीमाशंकरचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलंय.
Beed News: श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बीडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं मंदिर आकर्षक रोषणाईनं उजळून निघालंय. वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने भाविकांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे दर्शनासाठी राज्यासह परराज्यातूनही भाविक येत असतात. त्यांना दर्शन घेणं सुलभ व्हावं यासाठी मंदिराच्या उत्तरेकडील पायऱ्यांवर लोखंडी बॅरिकेटस उभारण्यात आलेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
विजयदुर्गवर आज साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी
कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक
लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -