लोकसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडेंच्या नाराजीवर भाजपने शोधला उपाय? दिल्लीतून मिळाली मोठी जबाबदारी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jul 2023 03:47 PM
Pune Water Cut : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; उद्यापासून पाणीकपात रद्द, चंद्रकांत पाटलांची घोषणा
Pune Water Cut : पुण्यातील खडकवासला धरणामध्ये पाणीसाठी उपलब्ध झाला असल्यामुळे पुण्यातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत घेतला आहे. Read More
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडेंच्या नाराजीवर भाजपने शोधला उपाय? दिल्लीतून मिळाली मोठी जबाबदारी
BJP Central Committee: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. Read More
Sangli News : कडेगावमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोहरम; अभूतपूर्व उत्साहात गगनचंबी ताबूत भेटींचा सोहळा
सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. याठिकाणी पार पाडणारा मोहरम सण हा प्रतीक आहे. गेली दीडशे वर्षांपासून कडेगावमध्ये गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा पार पडतो. Read More
 Wardha News : वर्ध्यात 13 हजार 932 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार थेट बांधावर
 Wardha News : वर्ध्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा हिंगणागावाला बसला आहे. Read More
kolhapur News: कोल्हापुरात आता 'टोमॅटोखोरां'चा उच्छाद; सीसीटीव्हीला चकवा देत 50 हजारांचे टोमॅटो लंपास
टोमॅटो शेतीची केलेली नासधूस ताजी असतानाच आता टोमॅटोच शेतातून चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाडमध्ये सीसीटीव्ही असतानाही चोरट्यांनी शेतातील टोमॅटो तोडून लंपास केले आहेत.  Read More
Lokmanya Tilak National Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार; रोहित टिळकांची 'माझा'ला माहिती
Lokmanya Tilak National Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. Read More
Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी इंचाइंचाने कमी होत असल्याने पूरस्थिती कायम; कडवी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला 
कोल्हापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यावरील पाणी ओसरत असले, तरी पंचगंगा नदीचे तुलनेत अतिशय संथ गतीने कमी होत आहे. पाणी पातळीत वाढ न झाल्याने पुरबाधित गावांना तसेच स्थलांतरित केलेल्या कुटुबांना मोठा दिलासा मिळाला आहे. Read More
Ahmednagar News: राहुरीतील दोन गटातील वादाला नवं वळण, दोन मुलींची पोलिसांत तक्रार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
Ahmednagar News: अहमदनगरमधील उंबरी येथे अल्पवयीन मुलींचा विनभंग केल्याप्रकरणी दोन गटामध्ये वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात आता आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Thane News: मद्यपान करून ट्रिपल सीट जाताना पोलिसांची कारवाई; ठाण्यातील तरुणाची निराश होऊन आत्महत्या
Thane News: दुचाकीवरुन जात असताना पोलिसांनी कारवाई केल्यामुळे आर्मी आणि पोलीस मध्ये भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणाने नैराश्येतून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.