Ganeshotsav 2023: गणेशोत्सव मंडळांना दिलासा; कार्यकर्त्यांची धावपळ संपणार, परवानगीसाठी ऑनलाईन ‘एक खिडकी’ची सुविधा

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jul 2023 10:10 PM
Maharashtra Sugar Production: असमाधानकारक पावसामुळे साखरेला महागाईची कडवट चव? यंदा राज्यातील साखर उत्पादन घटण्याची भीती
Maharashtra Sugar Production: राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस असला तरी ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्याच्या परिणामी राज्यातले साखर उत्पादन घटण्याची भीती आहे. Read More
Ganeshotsav 2023: गणेशोत्सव मंडळांना दिलासा; कार्यकर्त्यांची धावपळ संपणार, परवानगीसाठी ऑनलाईन ‘एक खिडकी’ची सुविधा
Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिकेने मोठा दिलासा दिला आहे. परवानगीसाठी पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाकडे वेगळा अर्ज करण्याची गरज नसून ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. Read More
Mumbai News: मुंबई: अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरातील नेऊला इमारतीचा पहिला मजल्यावरील फ्लॅटला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Mumbai News:  अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरातील नेऊला इमारतीचा पहिला मजल्यावरील फ्लॅटला आग लागली आहे.संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती आहे.  घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा पाच गाड्या घटनास्थळ दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं माहिती मिळताच इमारतीमध्ये राहणारे नागरीक घराबाहेर पडले आहेत. 

Mumbai Police:  मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती? गृह विभागाने वृत्त फेटाळले, म्हटले...
Mumbai Police Recruitment:  मुंबई पोलीस दलात कंत्राटी तत्वावर भरती होणार असल्याचे वृत्त गृह विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.