Sindhudurg Rain Updates: तळकोकणात मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला, पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरण; मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, तपास सुरू
Sindhudurg Rain Updates: तळकोकणात मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला, पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
BMC Covid Scam : बीएमसी कोविड घोटाळ्याची एसआयटीची चौकशी दुसऱ्या दिवशीही सुरू
बीएमसी कोविड घोटाळ्याची एसआयटीची चौकशी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशीही बीएमसी मुख्यालयात आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून तपास सुरू आहे. EOW महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे. कॅग अहवाल आणि एसआयटीने कोविड घोटाळ्यांच्या तपासात अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. कॅग अहवालावरच ही चौकशी सुरू असून संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
अलीकडेच कोविड घोटाळ्याशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे एजन्सीच्या हाती आली, ज्यात कोविड घोटाळ्याबाबत काही नेते यांनी बीएमसी आयुक्तांना लिहिलेल्या काही पत्रांचा समावेश आहे. कंत्राटदार कंपनीकडून लाभ घेतल्यानंतर नेते संशयास्पदरित्या गप्प राहिले, असा आरोप होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईओडब्ल्यू काही राजकीय आणि सरकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावू शकते. यापूर्वी, आझाद मैदान पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मुंबई पोलिस, ईओडब्ल्यू आणि ईडी कोविड घोटाळ्याची चौकशी करत आहेत.