Yavatmal Accident: यवतमाळमध्ये भीषण अपघात; गाडीचा चेंदामेंदा, 4 जण ठार

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jul 2023 09:09 PM
जैन मुनींच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

बेळगाव: चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील  जैन मुनींच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना चिकोडी पोलिसांनी हिंडलगा कारागृहातून ताब्यात घेतले.अत्यंत निर्घृण पद्धतीने हिरेकुडी येथील जैन मुनींची हत्या करण्यात आल्याने कर्नाटक सह अनेक ठिकाणी मुनींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जात आहे.कर्नाटक सरकार सत्य दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील हिंदुत्ववादी संघटना आरोप करत आहेत.चिकोडी पोलिसांनी हत्या प्रकरणातील आरोपीच्या कडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पंधरा दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.पण न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये भीषण अपघात; गाडीचा चेंदामेंदा, 4 जण ठार
Yavatmal Accident News: यवतमाळच्या करंजीपासून दीड किलोमीटर अंतरावर कोठोडा गावाजवळ ओमणी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. Read More
Dhananjay Munde: "मला 50 लाख रुपये द्या, नाहीतर..."; छगन भुजबळांपाठोपाठ मंत्री धनंजय मुंडेंना जीवे मारण्याची धमकी
Death Threat To Dhananjay Munde : नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी. Read More
Akhilesh Yadav Mumbai Visit : अखिलेश यादव मुंबईत आले, पण शरद पवारांची भेट न घेताच परतले; का?
Akhilesh Yadav Mumbai Visit : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव मुंबईत आले, पण विरोधी पक्षआच्या नेत्यांच्या भेटी न घेताच परतले. यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. Read More
Nashik News : 'वधू' एक 'वर' मात्र अनेक; लग्नाचा बाजार मांडणारी 'वधू' दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात
Nashik News : हातावरील मेहंदीचा रंग उतरण्याआधीच पसार झालेल्या या वधूला दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यापूर्वीच पकडल्याने एका तरुणाची फसवणूक टळली. नाशिक जिल्ह्याच्या मालेगावातील ही घटना आहे. Read More
Chhagan Bhujbal Death Threat : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी अटकेत
Death Threat To Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी.

छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या मोबाईलवर फोन करून धमकी.

पुणे पोलिसांकडून आरोपी प्रशांत पाटीलला अटक. Read More
Akola Rain Updates: अकोल्यात मुसळधार; मूर्तिजापूर तालुक्यात रेल्वे रूळाखालील भराव वाहून गेल्यानं वाहतुकीवर परिणाम
Akola Rain Updates: आज पहाटेपासून ही वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईकडे जाणारी अप मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.