Maharashtra ST Workers :  एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संघर्षाच्या मैदानात; प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Aug 2023 07:24 PM
शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर

संभाजीनगर - शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर आले आहे , ठीक ठिकाणी त्यांचा जोरदार स्वागत करण्यात आले या स्वागताच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलंय..

पक्ष संघटनेचे काम कसं सुरुय हे पाहण्यासाठी हा दौरा आहे.. प्रत्येक कार्यकर्ते पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे... पक्ष संघटना मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे...येणाऱ्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करतोय यात शंका नाही...आम्ही निरीक्षक पाठवले आहे त्यात पक्षाची स्तिथी सुद्धा पाहतोय..

जुने नेते आमच्या सोबत आहेत ती आमची ताकत आहे.. ती लोक फक्त आमच्यावर आरोप करतात,मात्र आम्हाला मिळणार प्रतिसाद बघा, यातून आमची ताकत दिसते...

सरकार चांगलं काम करतंय, म्हणून लोक येताय हे सत्य आहे मात्र काम झालं पाहिजे म्हणून तर लोक येणार ना, लोकांना विकास हवाय...

नीलम ताई आल्या,कायंदे ताई आल्या,अनेक जण आमच्या सोबत येताय,सगळ्यांना शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे..

तीन पक्षांचे सरकार आहे,कुणाची पीछेहाट नाही, सरकार मजबूत झाले आहे...

लोकसभा विधानसभा निवडणूक आहेच, मात्र शिवसेनेचे 13 खासदार आमच्या सोबत आहे, राष्ट्रवादी पण आहे , 3 ही पक्षांची टाकत पाहून कोण कुठं लढणार याचा निर्णय वरिष्ठ घेईल...कुरघोडी होतेय तर ठीक आहे, प्रत्येक पक्षाला मोठं होण्याचा अधिकार आहे....

Maharashtra ST Workers :  एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संघर्षाच्या मैदानात; प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा
Maharashtra ST Workers : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. Read More
Panvel-Nanded Train : पनवेल-नांदेड ट्रेनमध्ये झुरळांचा सुळसुळाट, पुणे स्टेशनवर दोन तासांपासून ट्रेन थांबून, प्रवाशी आक्रमक
pune station : पनवेल ते नांदेंड ट्रेनमधील एसी बोगीमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळे असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. Read More
Mumbai News: मुंबई हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; मानखुर्द आणि वाशी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा

Mumbai News: मुंबई हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी आणि मानखुर्द स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आहे. यामुळे पनवेल जाणारी वाहतूक थांबली आहे. ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाल्याने प्रवासी रखडले आहेत. 

BEST Strike : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला; राज्य सरकारने अधिसूचना काढत उचलले महत्त्वाचे पाऊल
Mumbai BEST Bus Strike : बेस्टमधील कंत्राटी चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खासगी वाहनातून टप्पा प्रवासी वाहतुकीला मंजुरी दिली आहे. Read More
15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, नाशिकमध्ये ACB मोठी कारवाई
Nashik ACB Trap : नाशिकमधील तहसीलदाराला 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पडकडण्यात आले Read More
Kolhapur Railway Station : कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामाचे उद्या भूमिपूजन; अमृत ​​भारत स्टेशन योजनेंतर्गत होणार विकास
Kolhapur : कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 43 कोटी रुपये मंजूर झालेत. या योजनेतील देशभरातील कामांचे भूमिपूजन उद्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. Read More
Mumbai Metro One : SBIची मुंबई मेट्रो वन विरुद्ध दिवाळखोरीची याचिका; अंबानींची मेट्रो 1 एमएमआरडीए ताब्यात घेणार?
Mumbai Metro One :  मुंबई मेट्रो वन कंपनी विरुद्ध स्टेट बँकेने दिवाळखोरीची याचिका दाखल केेली आहे. तर, दुसरीकडे मेट्रो वनमधील भागिदार असलेली एमएमआरडीए ही कंपनी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. Read More
Pune- Mumbai Express Highway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार; MSRDC कडून घेण्यात आला 'हा' मोठा निर्णय
पुणे-मुंबई प्रवास आता आणखी सोपा होणार आहे.  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघात आता काही प्रमाणात थांबण्याची शक्यता आहे. Read More
Ratnagiri News : आठवडा उलटला तरी 'तिच्या' मारेकऱ्यांचा शोध नाहीच, रत्नागिरीत नागरिकांचा तीव्र संताप तर पोलिसांच्या भूमिकेवरही संशय
Ratnagiri News : चिपळूणमधील निलिमा चव्हाण हिच्या मारेकऱ्यांचा पोलिसांनी अद्याप शोध घेतला नसल्यामुळे रत्नागिरीतील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. Read More
Devendra Fadnavis : आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली, अशांना उत्तर देऊन काय फायदा? देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर 
Devendra Fadnavis : बारसू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. Read More
Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाची व्यथा सोशल मीडियावर व्हायरल, तर मनसेचा महामार्गावरील खड्ड्यांवर खोचक टोला
Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांची व्यथा सांगणार एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.