सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल उद्योजक अजिंक्य राऊत यांची अज्ञात कारणावरून आत्महत्या

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Aug 2023 09:27 PM
Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल उद्योजक अजिंक्य राऊत यांची अज्ञात कारणावरून आत्महत्या

Solapur News :  सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल उद्योजक अजिंक्य राऊत यांची अज्ञात कारणावरून आत्महत्या


राहत्या घरी बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या


आज पावणे चारच्या सुमारास अजिंक्य राऊत यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती


रक्तबंबाळ आणि बेशुद्ध अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात आणण्यात आलेत होते


मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले


सोलापूर शहर पोलिसांकडून अधिक तपास सुरु, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात

Samruddhi Mahamarg : 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर 6 महिन्यातच खड्डे, अपघाताचा धोका वाढला
Samruddhi Highway Potholes : हजारो कोटींचा खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर 6 महिन्यातच खड्डे, अपघाताचा धोका वाढला Read More
Gautami Patil : 'ज्यांना कार्यक्रमाचा आंनद घ्यायचाय त्यांनीच या', नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमातील हुल्लडबाजीनंतर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया
Gautami Patil : अहमदनगरमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा हुल्लबाडी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गौतमी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Read More
Best Strike: सलग दुसऱ्या दिवशी 'बेस्ट' विस्कळीत;पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच
BEST Bus Workers Strike: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड, मुंबई सेंट्रल,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. Read More
Pandharpur News: 'विठ्ठलाचे झटपट दर्शन घ्यायचंय? दोन हजार रूपये द्या...' पंढरपुरात दोन एजंट रंगेहाथ पकडले
बडवे आणि उत्पात यांच्यासह अनेक एजंट विविध हॉटेलमधील भाविकांना अशा पद्धतीने पैसे घेऊन दर्शन घडवीत असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.