जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर; सरकारकडून कारवाईला सुरुवात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 03 Sep 2023 03:47 PM
Pune crime news : हॉटेलमध्ये शिरले, पाच जणांना बेदम मारहाण केली अन् 15 तोळ्यांची चैन हिसकावली; चाकणमधील घटना
पुण्याच्या चाकणमध्ये अज्ञात तिघांनी हॉटेलमध्ये बसलेल्या पाच ते सहा जणांना लाकडी दांडके आणि पाईपने बेदम मारहाण करून त्यांच्या गळ्यातील पंधरा तोळे सोन्याची चैन हिसकावल्याची घटना समोर आली आहे. Read More
Pune News : बॅगमध्ये पाच कोटीं किंमतीची व्हेल माशाची उलटी, गुडलक कॅफेमागे पोलिसांनी गाठलं अन् केली पोलखोल
पुण्यातील गुडलक कॅफेच्या मागे व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या व्हेल माशाच्या उलटीची किंमत तब्बल पाच कोटी रुपये आहे. Read More
जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर; सरकारकडून कारवाईला सुरुवात
जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. Read More
Pune News : चक दे इंडिया! पुण्यातील गिरीप्रेमींचा गृप ठरला माउंट मेरू शिखरावर यशस्वी चढाई करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक संघ
पुण्यातील गिरीप्रेमी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गिर्यारोहण क्लबने थेट मेरू पर्वतावर यशस्वी चढाई केली आहे. अशी यशस्वी एकत्र चढाई करणारा गिरीप्रेमी हा पहिला भारतीय ग्रुप बनला आहे. Read More
Maratha Reservation: मराठवाड्यात येणाऱ्या बसेस थांबवल्या, पुण्यातील 600 एसटी बसाल ब्रेक; प्रवाशांचे प्रचंड हाल
Maratha Reservation : पुण्यातून जाणाऱ्या 600 पेक्षा अधिक बस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  Read More
India: जसं तुम्ही कुत्रा आणि मांजर पाळता... तसं महाराष्ट्रातील 'या' गावातील लोक पाळतात कोबरा
Cobra Village: सापाला पाहून अनेकांच्या अंगावर काटे उभे राहतात, पण भारतात असं एक गाव आहे जिथे साप पाळले जातात. Read More
Bhatghar dam News : पर्यटनानंतर आधी जीव सांभाळा! चौघे सहलीला आले अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...; भाटघर धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. चार मित्र सहलीसाठी गेले होते यावेळी दोघांना पोहण्याचा मोह न आवरल्यामुळे पाण्यात उतरले. खोलीचा अंदाज आला नाही आणि थेट पाण्यात बुडाला. Read More
आज मध्य अन् हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा मुंबई लोकलचं वेळापत्रक
Mumbai Local Megablock: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. Read More
Pune Crime News : लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेला तरुण पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद
पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा बाळगण्याची गरज असल्याचं समोर आलं आहे. लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेल्या तरुणाला पुणे रेल्वे स्थानकावर पकडण्यात आलं आहे. Read More
Gautami Patil : गौतमी पाटीलने घेतली वडिलांची दखल; म्हणाली,"माणुसकीच्या नात्याने..."
Gautami Patil Father : गौतमी पाटीलचे वडील धुळ्यातील रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Read More
Pune Crime: इंदापुरात शेतमजुरांमध्ये वाद; कोयत्याने वार करून एकाचा खून
Pune Crime: जेवण बनवण्याच्या कारणावरून इंदापुरात एका शेतमजुरानं दुसऱ्या शेतमजुराची कोयत्यानं वार करून हत्या केली आहे. Read More
Bhandara News : फडणवीसांवर कारवाई करण्याची दादांमध्ये हिंमत आहे? नाना पटोलेंचा अजित पवारांना सवाल
Nana Patole On Ajit Pawar : जालना येथे झालेल्या लाठीचार्जमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत अजित पवारांना सवाल विचारला आहे. Read More
भिवंडीतील गौरीपाडा परिसरात दोन मजली इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

Bhiwandi Building collapses : भिवंडी (Bhiwandi) शहरातील गौरीपाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना माहिती घडताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले 

साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात

Satara : आज साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेला राज्यभरासह देश पातळीवरचे धावपटू आले आहेत. घाटमाथ्यावराची ही  पहिलीच स्पर्धा असून या स्पर्धेचं नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचला आहे. या स्पर्धेत देश-विदेशातील खेळाडू सहभागी झालेले दिसतात. प्रचलित कास पठार परिसराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटातील ही स्पर्धा भरवली जाते. यंदाचे हे स्पर्धेचे 12 वे वर्ष असून या स्पर्धेत तब्बल साडेसात हजार स्पर्धक धावणार आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


केंद्र सरकारकडून संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे 18 ते 22 सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 5 सत्र होणार आहेत.केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत. 


राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना


 महाराष्ट्र राज्यात अमंली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन करण्याचे प्रमाण वाढत असल्याने ड्रग्जला रोखण्यासाठी राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.पोलीस महासंचालकांचे मार्गदर्शन आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण याचा देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधिपत्याखाली ही टास्क फोर्स काम करेल 


 इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस


मुंबई मध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीचा आज दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे.या बैठकीसाठी 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी म्हणजे नेते मुंबईत उपस्थित आहेत. इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा ग्रुप फोटोसेशन.. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक


 महायुतीच्या बैठकीचा दुसरा दिवस


महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे.सकाळी 9 वाजता, एनएससीआय येथे विभागवार बैठकीतून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.


आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे


आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधाच्या दरात एकाच वेळी दोन रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू होतील. 85 रुपयांऐवजी आता 87 रुपये लिटरने दूध मिळणार आहे. चारा आणि जनावरांच्या चाऱ्याच्या दरात 20 टक्के वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


आजपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे काही महत्वाचे बदल


देशातील ऑईल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतींत बदल करतात. अशा परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर्सच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधनाच्या (ATF) किमती बदल करतात, त्यामुळे यावेळेस सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही CNG-PNG च्या दरांत बदल केला जाऊ शकतो.


 उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर


उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे बांधण्यात येत असलेल्या 'महेंद्रगिरी' या युद्धनौकेच्या कार्यान्वित समारंभाला उपस्थित रहाणार आहेत. 'महेंद्रगिरी' ही MDL ने बांधलेली चौथी युद्धनौका आणि भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत सातवी स्टेल्थ फ्रिगेट आहे.
 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.