Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
![Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/28/583d65518835dc7d0815f9ccaa037ffef718a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत. तसेच, बीडमधील गुंडागर्दीवरुन टीकेची झोड उठली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/28/84dc69f911ae456733959005c7c26da6e41f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
बीडमधील या घटनेसंदर्भातच बोलताना मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे टीका करताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह दोन अभिनेत्रींची नावे घेतली
![Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/28/387d72025e63dbbfb50ba5fa300a70178f036.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांनी केलेल्या टिका-टिपण्णीला गांभीर्याने घेत महिला आयोगाकडे त्यांची तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, आज प्राजक्ता माळी यांनी आई व भावासोबत एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांच्या टीपण्णीवर तसेच, करुणा शर्मा यांनी केलेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली
प्राजक्ता माळी यांना पत्रकार परिषदेत बोलताना कंठ दाटून आला होता, तर डोळ्यांतून पाणीही आल्याचं पाहायला मिळालं.
प्राजक्ता माळी यांच्यासह तिच्या आईचेही डोळे पाणावल्याचं दिसून आलं. त्यामुळे, हाती रुमाल घेऊन अभिनेत्रीने आपल्या डोळ्यातील अश्रू रोखण्याचं काम केलं
भरपत्रकार परिषदेतच पाणी पिऊन प्राजक्ता माळींनी सुरेश धस यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असे म्हटले. तसेच, विनाकारण महिलांच्या चारित्र्यावर अशा प्रकारे शिंतोडे उडवण्यावरुनच जोरदार पलटवार केला.
या पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी भावूक झाल्याचं दिसून आलं. तसेच, यानंतर त्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही समजते.