PM Modi Uttarkashi Live Updates : पंतप्रधान मोदींचा बोगद्यातून बचावलेल्या मजुरांशी संवाद, फोन करून तब्येतीची विचारपूस

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Nov 2023 02:01 PM
Rahul Dravid : राहुल द्रविडचं टीम इंडियाचा कोच, बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब

Rahul Dravid : Rahul Dravid : राहुल द्रविडचं (Rahul Dravid) भारतीय संघाचा मुख्य कोच म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयने (BCCI) याबाबत अधिकृत माहिती दिली. 

Charlie Munger Death : दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचे सल्लागार चार्ली मंगर यांचं निधन, 21000 कोटींचे मालक

Charlie Munger Passes Away : दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचे सर्वात विश्वासू सल्लागार चार्ली मंगर यांचं 99 व्या निधन निधन झालं आहे. मंगर बर्कशायर हॅथवेचे वाइस चेयरमनही होते. चार्ली मंगर सुमारे 21000 कोटींचे मालक होते.

Sanjay Raut New : नारायण तातू राणे आणि त्यांची नेपाळी मुलं, संजय राऊतांचं राणेंना पहिल्यांदाच उत्तर

Sanjay Raut PC Live :  खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. नालायक शब्दावरुन राज्याचे राजकारण तापले होते. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर नारायण राणेंना अटक झाली, त्यासारखीच अटक उद्धव ठाकरेंना होणार का? अशी चर्चा रंगली होती. आता नाराणय राणे यांच्या टीकेला संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलेय, त्याशिवाय त्यांच्या मुलावरही निशाणा साधलाय. 

Maharashtra Weather : राज्यात पुढील 48 तास पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीट; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Maharashtra Weather Today : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील 48 तास राज्यात पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यासह देशातही पावसाचा अंदाज आहे. राज्यात विविध ठिकाणी आज मध्यम पावसाच्या सरी कोसळणार आहेत, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 

Samruddhi Mahamarg : दिवाळीत चाकरमान्यांची समृद्धी महामार्गाला पसंती, अपघातांचं प्रमाणही कमी; कारचा प्रवास विक्रमी

Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) नेहमी चर्चेत असतो तो यावर होणाऱ्या अपघातांमुळे (Accident) मात्र आता समृद्धी महामार्ग सुरक्षितपणे वाहने चालवून वाहनचालक मोठ्या प्रमाणात वापरताना दिसत आहे. गेल्या महिनाभरात या महामार्गावर प्रवास केलेल्या कारच्या संख्येवरून हे समोर आलं आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच कार धावल्या असून अत्यंत कमी अपघात या काळात झाले आहे हे विशेष आहे. 

Assembly Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून

Maharashtra Winter Session : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

Radhakrishna Vikhe Patil : भुजबळांनी राजीनामा द्यावा, आज लोकं आदराने बोलतायत, उद्या थेट..; राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट आपली भूमिका मांडत आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा नवा वाद निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, यावरूनच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी थेट भुजबळ यांच्यावर निशाणा साधत त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आज लोकं त्यांना आदराने बोलतायत, उद्या त्यांच्यावर कारवाईची मागणी करतील असेही विखे म्हणाले. कोल्हापूर दौऱ्यावर असतांना विखे यांनी माध्यमांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Salman Khan : लॉरेन्स बिष्णोई गँककडून सलमान खानला पुन्हा धमकी; भाईजानच्या सुरक्षेत वाढ
Salman Khan : लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.