Marathwada Water Issue : मराठवाडा विरुद्ध उ. महाराष्ट्र पाणी संघर्ष; एका भागाला पाण्याची गरज, तर दुसऱ्या भागाचा विरोध!
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बागेश्वरधामच्या धीरेंद्र शास्त्रींनी घेतलं देहूत तुकाराम महाराजांचं दर्शन, तुकारामांबद्दल केलेल्या वादगस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींची पुन्हा माफी
मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करतायत..इगतपुरीमध्ये जरांगेंची मोठी सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत आणि एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केलीये.
MLA Disqualification Case: आमदार अपात्रता सुनावणीत आजही ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची उलट तपासणी सुरू आहे. प्रभूंवर 21 जूनच्या व्हीपवरून प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. 21 जूनला संपर्कात नसलेल्या आमदारांना बैठकीचा व्हीप हा व्हॉट्सअॅपद्वारे दिल्याचं सुनील प्रभूंनी म्हटलंय. तर आपल्यासोबत 12 आमदार होते त्यांना थेट व्हीप दिल्याचं प्रभूंनी आपल्या साक्षीत म्हटलंय. सुनील प्रभूंनी 12 आमदारांची नावं या सुनावणीत सांगितली. आमदारांना व्हीप मिळाल्याची पोच घेतली असं आपण म्हणता मात्र त्याचे पुरावे नाहीत असं शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी म्हटलंय. मात्र प्रभूंनी पोच घेतली नसल्याचं फेटाळलं.
Deepfake Video Issue: केंद्र सरकारने डीपफेक व्हिडीओबाबत आता कठोर पावले उचललीत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डिपफेक व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांसाठी 36 तासांचा अल्टीमेटम दिलाय.. फेसबुक, गुगल आणि युट्युबवरुन डीपफेक व्हिडीओ न हटवल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराच दिला आहे.
Rahul Gandhi on PM Modi: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. आपली टीम वर्ल्डकप जिंकले असते, पण पनवती तिथं गेल्यानं आपली टीम हरली असं राहुल गांधी म्हणाले.
Latur News: लातूरच्या ट्यूशन एरियात मंगळवारी 55 हून अधिक पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं. या कारवाईत 33 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ट्यूशन एरियामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये समाजकंटकांकडून नशा करणे, गुंडगिरी आणि मुलींची छेड काढणे असे गुन्हे वारंवार घडत असतात. त्यामुळे, गुन्हेगारांना जरब बसावा या उद्देशाने संपूर्ण लातूर शहरातील पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या प्रकरणी एमव्ही अॅक्टच्या 188 केस दाखल करण्यात आल्या आहेत. तर 1 लाख 37 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत. उद्या पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा पार पडणार आहे. चंद्रभागा तीरावर हजारो वारकऱ्यांनी स्नानासाठी गर्दी केलीए. उजनी धरणातून सोडलेलं पाणी अद्याप पोहोचलं नसल्यानं अपुऱ्या पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ आलीय.
IPO Updates: यंदाच्या आठवड्यात 6 आयपीओ बाजारात येणार आहेत. या सहा आयपीओच्या माध्यमातून कंपन्या जवळपास साडे सात हजार कोटींचा निधी उभारणार आहेत. टाटा टेक्नाॅलाॅजीज, इरेडा, गांधार ऑईल रिफायनरी, फ्लेयर रायटिंग इंडस्ट्रीज, राॅकिंग डिल्स सर्क्युलर इकाॅनाॅमी आणि फेडबॅंक फायनान्शिअल कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. टाटा ग्रुपचा टाटा टेक आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार असून ज्यात 24 नोव्हेंबरपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येईल. महत्त्वाचं म्हणजे टीसीएसनंतर टाटा ग्रुपचा 20 वर्षांत पहिलाच आयपीओ येणार आहे.
Mumbai News: मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल
मुंबईत मोठा कांड होणार असल्याची दिली माहिती
दक्षिण नियंत्रण कक्षाच्या लॅंडलाईनवर संपर्क करून दिली माहिती
मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान आला होता फोन
Amravti News: अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर येथे एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी काल तणावाचं वातावरण होतं. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेकडून आज मोर्शी, दर्यापूर आणि चांदूरबाजार शहर बंदचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान पोस्ट व्हायरल करणाऱ्याला अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी केली जातेय.
- आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर, कोकणात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
- कोकणातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवस खळा बैठका घेणार आहेत
- या खळा बैठकांमध्ये अगदी अंगणात बसून कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी आणि कोकणवासीयांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील
- रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये या खडा बैठका घेण्यात येणार आहेत
- गुरुवारी दोडा मार्ग ते सावंतवाडी, सावंतवाडी ते कुडाळ, कुडाळ ते बांबार्डे, बांबार्डे ते कणकवली, कणकवली ते राजापूर, राजापूर ते करबुडे असा आदित्य ठाकरेंचा दौरा असेल
- तर शुक्रवारी चिपळूण ते खेड, खेड ते महाड, महाड ते नागोठणे असा दौरा करत ठीक ठिकाणी या खळा बैठका घेतल्या जातील
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -