पुण्यात एसटी बसची वाहनांना धडक,फातिमानगरमध्ये भरधाव एसटीची दोन कारसह पाच दुचाकींना धडक
भरधाव एसटीने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली आहे. पोलिसांनी एसटी बसचालकला (ST Bus Accident) ताब्यात घेतले आहे.
पुणे : पुण्यात फातीमानगर (Pune FatimaNagar Accident) भागात भीषण अपघात घडला आहे. एसटी बसने सात वाहनांना उडवले असून अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. भरधाव एसटीने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली आहे. पोलिसांनी एसटी बसचालकला (ST Bus Accident) ताब्यात घेतले आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एसटी बस सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जात होती. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात मोटारीतील आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, अन्य सहा जण किरकोळ जखमी झालेत. पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी एसटी बसचालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला) याला ताब्यात घेतलंय
बसमध्ये अपघाताच्या वेळी 30 प्रवासी
पुण्यातील हडपसर रस्त्यावर कायमच वर्दळ असत. या मार्गावर कायम वाहतूक कोंडी असते. दरम्यान, मंगळवारी रात्री या मार्गावर रामटेकडी येथे मोठा अपघात झाला. सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून रात्री फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात अपघात झाला बसमध्ये अपघाताच्या वेळी 30 प्रवासी यावेळी होते.
अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी
दरम्यान,ब्रेक न लागल्याने बसने चार ते पाच वाहनांना धडक दिली. यात काही कारचा चक्काचूर झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तर चार ते पाच नागरीक जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
पुण्यात पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोनं 6 वाहनांना चिरडलं
पुण्यात पिरंगुट घाटात अपघाताची घटना घडली. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या अपघातात टेम्पोने 6 वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात सात जण जखमी झाले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पाहून अनेकांच्या मनात धडकी भरेल. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका डॉक्टरचा समावेश असून गंभीर अवस्थेत त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले आहे. उर्वरित सहा जखमींना पिरंगुट तसेच लवळे फाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.