Maharashtra LIVE Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Jan 2024 11:06 PM
Nanded News : नांदेड देगलूर बिदर रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून 750 कोटी रुपयांची तरतूद; नांदेडकरांकडून आनंद साजरा

Nanded News :  नांदेड देगलूर बिदर रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने 750 कोटी रुपयांची तरतूद केलीय, सरकारच्या या निर्णयाचे नांदेडच्या नायगांव शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. फटाक्यांची आतिषबाजी करत नायगांव आणि नरसी येथील नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलय. तसेच या नुतन रेल्वेमार्गासाठी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्याबाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

Bhiwandi : राष्ट्रवादीच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती

Bhiwandi :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पक्षाचे अधिवेशन शिर्डी येथे सुरू असून या ठिकाणी शरद पवार यांनी बाळ्या मामा यांची भिवंडी लोकसभा प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.

Bhiwandi : राष्ट्रवादीच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती

Bhiwandi :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पक्षाचे अधिवेशन शिर्डी येथे सुरू असून या ठिकाणी शरद पवार यांनी बाळ्या मामा यांची भिवंडी लोकसभा प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.

Nagpur News : नागपुरात भीषण अपघात, आई आणि मुलाचा मृत्यू 

Nagpur News :  नागपूर वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवा मैल चौकात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलीये. या अपघातामध्ये आई आणि मुलाची मृत्यू झाला. तसेच मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. 

Maharashtra Live Updates : 2005 पूर्वी शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून रूजू झालेल्या कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Maharashtra Live Updates : 2005 पूर्वी शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून रूजू झालेल्या कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे. साडेचार ते पाच हजार कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राजन साळवी यांचे कुटुंबीय एसीबी चौकशीसाठी राहणार हजर

रत्नागिरी - 10 जानेवारी रोजी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे कुटुंबीय एसीबी चौकशीसाठी राहणार हजर आहेत. अलिबाग येथील एसीबी कार्यालयात राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची चौकशी होणार आहे.  चौकशी वेळी राजन साळवी स्वतः कुटुंबासोबत हजर राहणार आहेत.


 राजन साळवी यांना एसीबी नोटीस आल्यानंतर आल्यानंतर आता त्यांची भाऊ, वहिनी आणि पुतण्याला देखील एसीबीसी नोटीस

Maharashtra Live Updates : राष्ट्रवादीचे आमदार शेळके आणि बनसोडेंचा बोलवता धनी वेगळा. मावळ लोकसभेत तिढा निर्माण करण्यामागे अजित पवारांचा हात?

Maharashtra Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मावळ लोकसभेतील सभेपूर्वी अजित पवार गटाने खासदार श्रीरंग बारणेंना कोंडीत पकडलं आहे. आमदार सुनील शेळके थेट बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला तर आमदार अण्णा बनसोडेंनी पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची मागणी केली. पण आता बारणेंनी ही पलटवार केला आहे. या दोन्ही आमदारांचा बोलवता धनी वेगळा आहे. तेच मावळ लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा वाढवू पाहतायेत. असं म्हणत बारणेंनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या दिशेने बाण सोडला आहे. 

New Delhi : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीसांची बैठक 6 जानेवारीला होणार

New Delhi : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीसांची बैठक 6 जानेवारीला पार पडणार आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता भाजपच्या सरचिटणीसांची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि राम मंदिर प्रचारासह अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

Uttar Pradesh : 19 ते 21 जानेवारी दरम्यान तीन दिवस आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

Uttar Pradesh : 19 ते 21 जानेवारी दरम्यान तीन दिवस आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव साजरा करण्याचं आयोजन उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात येणार आहे. या दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पतंगपट्टू महोत्सवात सहभागी होणार आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी हा पतंग महोत्सव पार पडणार आहे. 

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आजची सुनावणी रद्द

Maharashtra LIVE Updates : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आजची सुनावणी रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडल्यामुळे सुनावणी रद्द झाल्याचं समजतेय. वेळेअभावी सुनावणीचे वेळापत्रक मात्र आजच तयार होणार असल्याचीही माहिती मिळतेय. 

Maharashtra LIVE Updates : महाविकास आघाडीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील- उबाठा सेना डॉ राहूल पाटील

Maharashtra LIVE Updates : आता यांनी काही करू द्या . 48 पैकी 40 लोकसभेच्या जागांवर महाविकास आघाडीचे खासदार निवडून येतील, असा विश्वास परभणीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी परभणी व्यक्त केलाय. परभणी लोकसभा ही शिंदे गटच लढवणार आणि जिंकणार असे म्हणणाऱ्या अर्जुन खोतकरांना ही राहुल पाटील यांनी टोला लागवलाय सगळीकडे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाच बोलबाला आहे त्यामुळे राज्यासह परभणी लोकसभेत ही आमचाच उमेदवार निवडून येणार असे आमदार राहुल पाटील म्हणले आहेत.

Pune : मालवाहतूकदारांच्या आंदोलनानंतर आता राज्यातील एसटी कामगार संघटना आक्रमक

Pune : मालवाहतूकदारांच्या आंदोलनानंतर आता राज्यातील एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विविध प्रलंबित मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत भेटी होऊनही त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्या विरोधात आता एसटी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे येत्या 13 फेब्रुवारीपासून राज्यात विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण सुरू करण्यात असल्याचं एसटी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारसोबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची बैठक झाली होती. त्या कामगार करारात सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढीचा दर कामगारांना देण्याचे सरकारने मान्य केले होते. त्यानुसार मागील महागाई भत्तेची घरभाडे भत्ता थकबाकी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन देण्याची मागणी केली होती तरीही त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यामुळे आता एसटी संघटनानी आंदोलनाचा इशारा दिला आहे.


 

Maharashtra Live Updates : शिवडी नावाशेवा टोल संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; हलक्या वाहनांना टोल 250 रुपये

Maharashtra Live Updates : शिवडी नावाशेवा टोल संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयात हलक्या वाहनांना टोल 250 रुपये ठेवला जाणार आहे. हा टोल 500 आणि 350 करावा असा प्रस्ताव होता. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत 250 रुपये करण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. 


 

Maharashtra Live Updates : 22 जानेवारी रोजी राज्यामध्ये मांसाहार आणि दारु विक्री बंद करावी - सुधाकर महाराज इंगळे 

Maharashtra Live Updates : 22 जानेवारी 2024 हा दिवस भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचा असून ऐतिहासिक आहे. हा आम्हा सर्वांसाठी सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यात यावा असा दिवस आहे. कारण प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापना अयोध्या येथे करण्यात येणार आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत. त्यामुळे 21 आणि 22 जानेवारी 2024 या दोन दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मांसाहार आणि दारु विक्री बंद करण्यात यावी. मांसाहारामुळे असुरी विचार बळावतात असे अनेक ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. असुरी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हे आवश्यक आहे. स्वहितासाठी आणि देशहितासाठी खूपच महत्त्वाचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो एक दिवस उपवास करण्याचा संकल्प केला आहे. आपण भारतीयांनी सुद्धा एक संकल्प केला पाहिजे. तो म्हणजे हा एक दिवस तरी पूर्ण सात्विक आहार घेऊन आपली सेवा श्रीरामाचे चरणी अर्पण करावी. तसेच आपल्या परिसरातील मंदिर, सार्वजानिक हॉल अशा ठिकाणी 22 तारखेला दुपारी भजन, कीर्तन, प्रवचन, कथा करुन उत्सव साजरा करावा, हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहिजे असे प्रयत्न सर्वांनी करावेत असे आवाहनही इंगळे महाराज यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदेश काढून संपूर्ण राज्यामध्ये मांसाहार आणि दारुविक्री बंद करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे देण्यात आले आहे असे सुधाकर महाराज इंगळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

मालेगाव : आव्हाडांना श्रीराम मांसाहारी होते हा साक्षात्कार कुठून झाला ? प्रकाश महाजन...

Maharashtra LIVE Updates : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून त्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.. मनसे नेते तथा प्रवक्ता प्रकाश महाजन यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे..प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असा साक्षात्कार आव्हाडांना कुठून झाला ? असा सवाल करत प्रभू श्रीरामांचा आदर्श घ्या,  समाजात दुही निर्माण होईल असे बेताल वक्तव्य करणाऱ्या आव्हाड, मिटकरी अशांना शरद पवार यांनी बाजूला सारले पाहिजे..शरद पवार हे देखील अशा नेत्यांचे समर्थन करतात का ? असा सवाल उपस्थित करतांना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शरद पवार यांचेवर देखील टीका केली

Mumbai : आरोग्य विभागाकडील विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करा; आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे निर्देश

Mumbai : आरोग्य विभाग अंतर्गत राज्यात नवीन शासकीय रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच शासकीय रूग्णालयांच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. ही सर्व विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहे. आरोग्य विभागाकडील विविध विषय, योजनांची आढावा बैठक मंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, महात्मा फुले जनआरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, सहसचिव अशोक आत्राम, सहसंचालक विजय बावीस्कर, विजय कंदेवाड आदी उपस्थित होते. ‘राईट टू हेल्थ’ कायदा याविषयी सूचना देताना मंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यात ऐतिहासिक असा राईट टू हेल्थ कायदा निर्माण करावयाचा आहे. या कायद्याचा मसुदा विधी आणि न्याय विभागाकडून अंतिम करून घ्यावा. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत पायाभूत सोयी सुविधा कक्षामार्फत राज्यात आरोग्य क्षेत्रातील विकास कामे सुरू आहेत. तसेच काही कामे मंजूर आहेत. ही कामे विहीत कालमर्यादेत पुर्ण करावी. प्रलंबित कामे न ठेवता रखडवू नये. आरोग्य विषयक महत्वाचे दिवसांचे वार्षिक कॅलेंडर तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाबाबत निर्देश देताना मंत्री डॉ. सावंत म्हणाले, औषधी खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी. प्रलंबित खरेदी ठेवता कामा नये. कुठेही औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. वस्तू खरेदी प्राधिकरणाची विशिष्ट कार्यपद्धती (एसओपी), ई- गोदाम, ई- पासबुक आणि ई- लॉजिस्टीक याबाबत कार्यवाही करावी. प्रक्रिया गतीने पूर्ण करून प्राधिकरण सक्षम करावे. 
यासोबतच अर्थसंकल्पीय तरतूद, खर्च आणि नियेाजन, खरेदी कक्षाकडील प्रलंबित विषय, विकास कामे, कॅथलॅब, रूग्णवाहिका 108 आदींचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. सदर बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Live Updates : बीडच्या गेवराईत गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड, गर्भपातासाठी लागणारे साहित्य आणि औषधेही जप्त

Maharashtra Live Updates : बीडच्या गेवराईमध्ये आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी एका गर्भलिंग निदान करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून गर्भलिंग निदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि औषधे जप्त करण्यात आली आहेत. गेवराईतल्या संजय नगर भागामध्ये मनीषा सानप ही महिला गेल्या काही दिवसांपासून गर्भलिंग निदान चाचणी करत होती अशी माहिती आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी मनीषा सानप या महिलेला ताब्यात घेतलं असून तिचा साथीदार सतीश गवारे हा फरार झाला आहे. यापूर्वी देखील गर्भलिंगनिदान चाचणी केल्याच्या प्रकरणी या महिलेवर तात्कालीन जिल्हा शालेय चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी कारवाई केली होती आणि या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातून परत सुटल्यानंतर या महिलेने आपला गर्भलिंगनिदान चाचणीचा गोरख धंदा परत सुरू केला. आता आरोग्य विभाग आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिच्यावर गेवराईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आणि जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. मात्र, राजरोजपणे असा गर्भलिंगनिदान चाचणीचा व्यवसाय करणाऱ्या या महिलेला कोणाचा अभाव होता? असे देखील प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

Maharashtra LIVE Updates : शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची दुपारी चार वाजता बैठक होणार

Maharashtra LIVE Updates : शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्याशी लोकसभा जागावाटप संदर्भात आणि इंडिया आघाडी सोबत चर्चा करणार असल्याच सांगितलं जातं आहे

Maharashtra LIVE Updates : यवतमाळ- टँकरला भरधाव दुचाकीची धडक; युवकाचा मृत्यू





Maharashtra LIVE Updates : यवतमाळ शहरात लोहारा मार्गाचे काँक्रिटीकरण सुरू असून हा रस्ता कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे जीवघेणा ठरत आहे. या रस्त्यावरील वाहतूक एकेरी करण्यात आली असून त्यात एका टँकरला भरधाव दुचाकी ने धडक दिली. या अपघातात अक्षय श्रीरामे या युवकाचा मृत्यू झाला. लोहारा मार्गावर हातगाड्या ठेले व  दुचाकी उभ्या राहतात मात्र या रस्त्यावर कुठलेही दिशादर्शक फलक कंत्राटदारने लावलेले नाही. रस्ता सुरक्षा बाबत कुठल्याही उपाययोजना देखील केल्या गेल्या नाहीत, ज्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.






Maharashtra LIVE Updates : सहकारी दूध संघांसोबत खाजगी दूध संघांना ही अनुदान मिळणार

Maharashtra LIVE Updates : दुधावर अनुदान देण्यासंदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. सहकारी दूध संघासोबत खाजगी दूध संघांना ही सबसिडी देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. पाच रुपयांच्या सबसिडीसह 32 रुपयांचा दर देण्यासंदर्भात एकमत झालं. 32 रुपयाचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार आहे. सहकारी दूध संघांनाच अनुदान देण्याच्या संदर्भात अधिवेशनात निर्णय झाला होता मात्र खासगी दूध संघांना ही अनुदान देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. या चर्चनंतर मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय झाल्यास थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे. 

Mumbai : सहकारी दूध संघांसोबत खाजगी दूध संघांना ही अनुदान मिळणार

Mumbai : दुधावर अनुदान देण्यासंदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे. पाच रुपयांच्या सबसिडीसह 32 रुपयांचा दर देण्यासंदर्भात एकमत झालं आहे. 32 रुपयाचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार आहे. सहकारी दूध संघांनाच अनुदान देण्याच्या संदर्भात अधिवेशनात निर्णय झाला होता मात्र खाजगी दूध संघांना ही अनुदान देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

BJP : भाजप कार्यकर्त्यांचे मंदिर स्वच्छता अभियान

BJP : रामलला प्राणप्रतिष्ठा पार्श्वभूमीवर 14 ते 22 जानेवारी दरम्यान भाजप कार्यकर्त्यांचे मंदिर स्वच्छता अभियान होणार आहे. भाजप कार्यकर्ते देशभरातील सर्व मंदिर, तिर्थक्षेत्र स्वच्छता अभियान राबवणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Washim : खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ

Washim : खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण संस्थेतील 19 कोटी रुपयांचा हिशोब देण्यासाठी नोटीस बजावली आहे.

Dhule : मोहाडीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या; चोरट्यांना रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन

Dhule : धुळे शहरातील मोहाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातला आहे. मागील महिन्यामध्ये मोहाडी पोलीस ठाण्यासमोरच एका दुकानात चोरट्याने धाडसी चोरी करत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते, मात्र पोलिसांनी अद्याप पर्यंत या चोरट्यांना ताब्यात घेतले नसल्याची माहिती समोर येत आहे. आता पुन्हा एकाच रात्री मधून तीन ठिकाणी घरफोड्या करत लाख रुपयांचा मुद्देमाल चोट्यांनी चोरून नेला आहे. 

Maratha Reservation : मराठा आरक्षण संदर्भात विशेष अधिवेशन घेण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता

Maratha Reservation : मराठा आरक्षण संदर्भात विशेष अधिवेशन घेण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण संदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची हिवाळी अधिवेशनात घोषणा झाली होती. मराठा आरक्षण संदर्भात युद्धपातळीवर राज्य सरकारच काम सुरु आहे.

Mangal Prabhat Lodha : 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा

Mangal Prabhat Lodha : 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. राम ललाची प्राणप्रतिष्ठापणा होताना राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची लोढा यांची मागणी आहे. 

Maharashtra LIVE Updates : महामार्गावर गतिरोधक बसवण्यासाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचं एक तास रस्ता रोको आंदोलन
Maharashtra LIVE Updates : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथून जाणाऱ्या अहमदनगर ते अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी एक तास रस्ता रोको आंदोलन केलं.. अहमदपूर अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच भालचंद्र महाविद्यालय आहे आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांना हा महामार्ग ओलांडून दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो अनेक वेळा मागणी करून देखील या महामार्गावर प्रशासनाकडून गतिरोधक बसवण्यात आलेला आहे त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी एक तास रस्ता रोको आंदोलन केलं.

 
पालघर - वाहन कायदा विरोधात माकपाचे डहाणूत आंदोलन




Maharashtra LIVE Updates : केंद्र सरकारने पारित केलेल्या वाहन कायद्याविरुद्ध आक्रमक झालेल्या वाहन चालकांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली आज डहाणू सागर नाका येथे रस्त्यावर उतरत निदर्शन केली. केंद्र सरकारने लागू केलेला अपघात कायदा हा अन्यायकारक असून यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल असून यावेळी हा कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.




Mumbai : शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची दुपारी चार वाजता बैठक होणार असल्याची माहिती

Mumbai : शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची दुपारी चार वाजता बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्याशी लोकसभा जागावाटप संदर्भात आणि इंडिया आघाडी सोबत चर्चा करणार असल्याच सांगितलं जातं आहे. 

Beed : महामार्गावर गतिरोधक बसवण्यासाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचं एक तास रस्ता रोको आंदोलन

Beed : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथून जाणाऱ्या अहमदनगर ते अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी एक तास रस्ता रोको आंदोलन केलं.. अहमदपूर अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच भालचंद्र महाविद्यालय आहे आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांना हा महामार्ग ओलांडून दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो अनेक वेळा मागणी करून देखील या महामार्गावर प्रशासनाकडून गतिरोधक बसवण्यात आलेला आहे त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी एक तास रस्ता रोको आंदोलन केलं.

Ratnagiri : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर

Ratnagiri : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 जानेवारी 2024 रोजी रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत.  रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर येथे ते शिव संकल्प अभियान घेणार आहेत. राजापूरमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी शिवसंकल्प अभियान होणार आहे. ठाकरे गटाचा आमदार असलेल्या राजापुरात एकनाथ शिंदे यांची होणार जाहीर सभा होणार आहे.

Solapur : सोलापुरातील वाहतूक संघटना आक्रमक भूमिकेत

Solapur : नव्या वाहतुक कायद्याविरोधातील संप वाहतुक युनियनने मागे घेतले तरी सोलापुरातील वाहतूक संघटना आक्रमक भूमिकेतच आहेत. लापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर वाहतुक संघटना संयुक्त महासंघाच्यावतीने निदर्शने करण्यात आली आहेत. 

विद्युत करंट लागल्याने दोघांचा मृत्यु, गोंदिया जिल्ह्यातील कटंगी येथील घटना

 विद्युत करंट लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथे आज सकाळी घडली आहे. घनश्याम वलथरे आणि संपत वलथरे असे दोन्ही मृतकांचे नाव आहे. गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील गावाच्या बाहेर असलेल्या विद्युत डीपीवर काही तांत्रिक अडचण आल्याने ते दुरुस्त करायला गेले असता विद्युत करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

Beed : ऊसतोड कामगार संघटनांच्या विविध मागण्यांसाठी आज शिर्डीत होणारी बैठक पुण्यात होणार

Beed : ऊसतोड कामगारांच्या संघटना कडून दरवाढ आणि विविध मागण्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक आज शिर्डी येथे होणार होती मात्र ही बैठक आता शिर्डीमध्ये न घेता पुणे येथे असलेल्या साखर संकुल या ठिकाणी घेण्यात येणार आहे.. ऐनवेळी या बैठकीचे ठिकाण बदलण्यात आल असून संध्याकाळी सहा वाजता ही बैठक पुण्यातल्या साखर संकुलात होणारा आहे या बैठकीला शरद पवार आणि पंकजा मुंडे उपस्थित असणार आहेत.

Mumbai : आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांची संख्या लक्षणीय

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतरही कोणताच तोडगा निघाला नसल्याने अजूनही आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांची संख्या लक्षणीय दिसते आहे. मानधन वाढ, पेन्शन आणि ग्रॅच्युटीसंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. 

सिडकोच्या हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनी देखभाल आणि दुरुस्तीचे कामामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई : सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोडना होणारा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. 05 जानेवारी  सकाळी 9 वाजेपासून ते 6 जानेवारी
सकाळी 09.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे प्रभावित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून, या कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.


 
आष्टी ते अंमळनेर या रेल्वे मार्गावर उद्या होणार पहिल्या रेल्वेची हायस्पीड चाचणी
आष्टी त्यामुळे या रेल्वे मार्गाचे 40 किलोमीटरचे काम पूर्ण झाला असून याच रेल्वे मार्गावर उद्या पहिल्या हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात येणार आहे 110 किलोमीटर वेगाने ही रेल्वे या चाळीस किलोमीटरच्या लोहमार्गावरून धावणार असून हाय हाय स्पीड चाचणी सुरू असताना कोणीही लोहमार्गाच्या आजूबाजूला थांबू नये अस आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आल आहे.

 
मराठा आरक्षणसाठी महसुल विभागातील अधिका-यांची रजा रद्द...

मराठा समाजाचे सर्वेक्षण होईपर्यंत महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आली आहे. सात दिवसांची मोहीम आखून मराठा समाजाची माहिती गोळा केली जाणार आहे.

दहिसर आणि मुलुंड जंम्बो कोव्हिड केअर सेंटर घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल
दहिसर आणि मुलुंड जंम्बो कोव्हिड केअर सेंटर घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. कंत्राटदार राहुल गोम्स, वेंडर्स आणि महानगरपालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय.
 


 
फिरायला जाऊ असे सांगत तिघांनी तीन मुलींवर लॉजवर केला लैंगिक अत्याचार

एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींशी आधी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधत तीन तरुणांनी ओळख वाढवली. त्यानंतर याच मुलींना  या तीन तरुणांनी फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली आहे. तीन तरुणांच्या या कृत्याचा प्रकार समोर आल्यानंतर  पीडित मुलींनी आपल्या कुटुंबासोबत आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर  संशयित पांडुरंग हनुमंत यमगर, सुभाष यमगर (दोघे रा. बनपुरी, ता. आटपाडी), किरण बाळासाहेब शेंडगे (रा. शेंडगेवाडी, ता. आटपाडी) या युवकांविरूद्ध 'पोक्सो' अंतर्गत  आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आटपाडी पोलिसांनी तिघांनाही तात्काळ अटक केली आहे.

आंबोलीत पर्यटकांच्या कारचा अपघातात एकाचा मृत्यू, सहाजण जखमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली नांगरतास येथे पर्यटकांच्या महेंद्रा थार कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात लातूर येथील सहाजण जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला. हे सर्वजण धाराशिव-लातूर येथून गोवा येथे चालले होते. कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. चालकाच्या बाजूस बसलेला दत्तात्रय व्यंकट जाधव हा जागीच मृत्युमुखी पडला. तर इतर सहाजण जखमी आहेत. जखमींना आंबोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

Nashik : नाशिकचे साधू महंत पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल होण्यास सुरुवात

Nashik : नाशिकचे साधू महंत पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी साधू महंत दाखल होत आहेत. श्री राम मांसाहार करत होते असे वादग्रस्त वक्तव्य आव्हाड यांनी केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल  केला जाणार आहे.

Maratha Reservation: मराठा समाजाचं सर्वेक्षण होईपर्यंत महसूल विभागाच्या रजा रद्द

Maratha Reservation: मराठा समाजाचं सर्वेक्षण होईपर्यंत महसूल विभागाच्या सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाचे सर्वेक्षण होईपर्यंत रजा रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सात दिवसांत मराठा समाजाची माहिती गोळा केली जाणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

Nashik News: सलग तिसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील परिस्थिती पूर्वपदावर नाहीच

Nashik News: सलग तिसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील परिस्थिती पूर्वपदावर आली नसून अनेक पंपांवर अजूनही पेट्रोल-डिझेलचे टँकर पोहोचले नसल्याने पंप कोरडेठाक पडले आहेत. दरम्यान आज सायंकाळ पर्यंत पूर्ण क्षमतेने पंप सुरू होतील असं नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनकडून सांगितलं जातय. 

Pandharpur Indrayani River: वारकरी सांप्रदयाची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी आजही फेसाळली

Pandharpur Indrayani River: वारकरी सांप्रदयाची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी आजही फेसाळली. कालच्या पेक्षा आज याचं प्रमाण अधिकच वाढलं आहे. हिवाळी अधिवेशनात हाच मुद्दा लक्षवेधी ठरला, सत्ताधारी आमदारांनी थेट राज्य सरकारला धारेवर धरलं. तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही जाग येईना. गेल्या सात वर्षांपासून ते केवळ कारवाईचा फार्स करण्यात धन्यता मानत आहेेत. पिंपरी चिंचवडमधील ज्या कंपन्या इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडतात, त्यांना पाठिशी घालण्याचं काम सुरुय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कानाडोळा करणाऱ्या राज्य सरकारचा ही याला पाठिंबा असल्याचं आता दिसून येतंय.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024 ही ठरवण्यात आलीय. सरकारने हायकोर्टात आज ही माहिती दिली. डिसेंबर 2023 ची डेडलाईन हुकल्याची प्रशासनाकडून कबुली दिलीय. प्रकल्पाचा विलंब थेट मूळ खर्चावर प्रभाव टाकतो, शेवटी पैसा जनतेच्याच खिशातून जाणार असं कोर्टाने सुनावलं. या वाढलेल्या खर्चाची जबाबदारी कोणाची? असा सवाल कोर्टाने सरकारला केला. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे राज्य सरकारला निर्देश देत हायकोर्टानं ओवैस पेचकर यांची याचिका निकाली काढली

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा आजपासून चार दिवस मराठा आरक्षण गाठीभेटी दौरा

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून ते गोदापट्ट्यातील 123 गावांच्या गाठीभेटी दौरा करणार आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील काही निवडक गावांना ते भेट देणार आहेत.या दौऱ्यात त्यांच्या कोणत्याही सभेचं नियोजन नसून गावातील मराठा समाज आणि आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. तसंच मुंबईतील आंदोलनाबाबत ते गावकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

Aaditya Thackeray: 'प्रायश्चित म्हणून एमटीएचएलचा टोल माफ करावा'; आदित्य ठाकरेंचं सरकारला आवाहन

Aaditya Thackeray: शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी लावण्यात येणाऱ्या टोलवरुन आदित्य ठाकरेंनी सरकारला चॅलेंज दिलंय. वेदांता फॉक्सकॉन, टेस्ला यांचं प्रायश्चित म्हणून एमटीएचएलचा टोल माफ करा असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय. 

Maharashtra News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचं होणार उद्घाटन

Maharashtra News: मुंबईमधून जेमतेम तासाभरात अलिबागामध्ये दाखल होण्याची उत्सुकतेनं प्रतीक्षा करत असाल, तर थोडं थांबा. आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठीचा एकेरी टोलचा प्रस्तावित दर एकदा ऐका. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी तब्बल 350 रुपये एकेरी टोल आकारण्याचा प्रस्ताव सध्या राज्य सरकारसमोर आहे. बसला ना धक्का. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. कारण 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं उद्घाटन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शिवडी ते न्हावाशेवा हा सागरी सेतू तब्बल 23 किलोमीटरचा असून, देशातला तो सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे. या सागरी सेतूविषयी राज्यातल्या नागरिकांमध्ये कुतूहलाची भावना आहेच, पण 350 रुपये टोलच्या प्रस्तावानं त्या कुतूहलाला आश्चर्याचीही जोड मिळाली आहे.

Maharashtra SSC, HSC Exams: शिक्षण संस्थाचालकांचा दहावी, बारावीच्या परीक्षांंवर बहिष्कार?

Maharashtra SSC, HSC Exams: फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी केंद्र म्हणून शाळेच्या इमारती आणि आवश्यक कर्मचारी वर्ग मिळणार का?? परीक्षा वेळेवर होऊ शकणार का?? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. कारण राज्यभरातील शिक्षण संस्थाचालक दहावी बारावीच्या परिक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान या कारणामुळे शाळा आणि शिक्षण संस्था डबघाईस आल्याचं शिक्षण संस्थाचालकांचं म्हणणं आहे. जोवर सरकार  प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही तोवर परीक्षांसाठी इमारती उपलब्ध करु देणार नाही असा इशारा शिक्षण संस्थाचालकांनी दिलाय. 

Saamana Editorial: 'ट्रकचालकांचा दणका, राममंदिर उद्घाटनामुळे तुम्ही घाबरलात'; हिट अँड रन सुधारित कायद्यावरुन 'सामना'तून सरकारवर हल्लाबोल

Saamana Editorial: हिट अँड रन सुधारित कायद्यावरुन ट्रकचालकांच्या देशव्यापी संपाचा मोठा परिणाम जाणवला. यावरुनच सामनातून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. ट्रकचालकांचा दणका आणि तोंडावर असलेले राममंदिर उद्घाटन यामुळे तुम्ही घाबरलात. त्यातून तुमच्या सरकारवरच हिट अॅण्ड रनची नामुष्की ओढवली, असं सामनात म्हटलंय. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.