Nashik To Pandharpur : 'चल गं सखे, चल गं सखे पंढरीला...' नाशिक आगारातून पंढरपूरसाठी 290 बसेस, थेट गावातुन करता येणार प्रवास

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 23 Jun 2023 08:27 PM
Maharashtra Exam: सरकारचा मोठा निर्णय! आता पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक
Maharashtra School Exam: शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी आता वार्षिक परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. Read More
Nashik To Pandharpur : 'चल गं सखे, चल गं सखे पंढरीला...' नाशिक आगारातून पंढरपूरसाठी 290 बसेस, थेट गावातुन करता येणार प्रवास
Nashik To Pandharpur : नाशिक विभागातून पंढरपूरसाठी जवळपास 290 जादा बस सोडण्यात येणार आहे. Read More
Monsoon 2023: पाऊस रेंगाळल्याने बळीराजाची चिंता वाढली! पेरण्या खोळंबल्या, फक्त 6.27 टक्केच क्षेत्रावर पेरणी
Palghar News: यंदा मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पेरण्या खोळंबल्या आहेत. Read More
Nashik Chhagan Bhujbal : मराठा पक्ष ही संकल्पना पुसण्यासाठी ओबीसी नेत्यांना संधी मिळावी, छगन भुजबळांची मागणी 
Chhagan bhujbal : राष्ट्रवादी मराठा लोकांची पार्टी नाही, पण लोकांमध्ये समज आहे. तो पुसला जावा, म्हणून.. छगन भुजबळ म्हणाले. Read More
Nashik Crime : 'ती' रेल्वेस्थानकांवर एकटीच, पाणी विक्रेत्याने तिला वडापाव दिला अन् त्यांनतर तरुणीसोबत भयंकर घडलं? 
Nashik Crime : नाशिकमध्ये विवाहित महिलेला वडापावच्या माध्यमातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. Read More
Hasan Mushrif: हसन मुश्रीफांच्या 'त्या' पत्रिकेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झळकले; कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरु होताच मुश्रीफांनी केला खुलासा! 
Hasan Mushrif: महाराष्ट्र सरकार आणि हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने गडहिंग्लजमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. यासाठी करण्यात आलेली कार्यक्रम पत्रिका मात्र चांगलीच व्हायरल झाली आहे. Read More
Nashik Accident : नाशिकच्या पेठरोडवर एसटी बस-ट्रकमध्ये भीषण अपघात, बस चालक वाचला, मात्र ट्रक चालकाचा मृत्यू
Nashik Accident : नाशिक महानगरपालिकेच्या कमानीजवळ भीषण अपघातात मिक्सर ट्रकचा चालकाचा मृत्यू झाला आहे.  Read More
Pune News : महिलांना छेडणाऱ्यांची आता खैर नाही; महिला सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली, काय आहे पोलिसांचा प्लॅन?
Pune News : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे.त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आता पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. Read More
अनैतिक संबंधाबाबत समजल्याने आईने पोटच्या लेकराचाच केला खून, तब्बल सात जणांची घेतली मदत; रायबागमधील खुनात कोल्हापुरातील आरोपी
जन्मदात्या आईनेच लेकराला नात्यातील तब्बल सात जणांची मदत घेऊन खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी आईसह तिघांना अटक करण्यात आली असून चौघे फरार आहेत. Read More
Mumbai News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त सात टक्के पाणीसाठा, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी कपातीची शक्यता
Mumbai News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये  फक्त 6.92 टक्के पाणीसाठा उरला आहे. तर राखीव पाणीसाठा मिळून मुंबईसाठी फक्त 12.73 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.  Read More
Ahmednagar Crime : शेवगावमध्ये भरवस्तीतील घरावर भल्या पहाटे दरोडा, दोघांचा मृृत्यू एक जखमी; व्यापारी आणि गवाकऱ्यांकडून बंदची हाक
Ahmednagar News : अहमदनगरमधील शेवगाव येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिसन बलदवा यांच्या राहत्या घरावर आज भल्या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकला. दरोड्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. Read More
Monsoon Update : आजपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी, 'या' राज्यांनाही मिळणार दिलासा
IMD Alert : आजपासून महाराष्ट्रासह उत्तर भारतात पुन्हा एकदा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. 26 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान  


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान होणार आहे पालखी प्रस्थान दु. 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत.  १९ दिवसांचा प्रवास करून हा पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.


आज राष्ट्रावादीचा 25 वा वर्धापन दिन 


   राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनासाठी आज शरद पवार दिल्लीत. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होईल.  प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीतले इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार  आहेत. राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई  विभागीय  राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या  वतीने आज सकाळी  09.30 वाजता मुंबईच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम  आयोजित केलाय. यावेळी खासदार जयंत पाटील , छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवार उपस्थित राहणार आङेत. 


  नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा


 नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपक्रमाअंतर्गत नांदेडमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतुल सावे, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित राहतील. या सभेत, मोदी सरकारची कामगिरी अमित शाहा जनतेसमोर मांडणार आहेत. दरम्यान नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर असतील. सकाळी 11 वाजता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. त्यानंतर भाजप कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत.  गेल्या काही दिवसांपासून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात केलीय त्या दृष्टीने नवीन नियुक्त्या केल्यात त्यापासून महाजन याना नाशिकपासून दूर ठेवल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यानंतर महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.