Maharashtra Politics Shiv Sena: विधान परिषद आमदारांचाही 'जय महाराष्ट्र'; फूट टाळण्यासाठी ठाकरे गट घेणार 'हा' निर्णय?

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 22 Jun 2023 11:07 PM
Mumbai Covid Scam: कोविड सेंंटर घोटाळा प्रकरण: आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीचे चौकशीसाठी समन्स
BMC Covid Scam: मुंबईतील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीने आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. Read More
Maharashtra Politics Shiv Sena: विधान परिषद आमदारांचाही 'जय महाराष्ट्र'; फूट टाळण्यासाठी ठाकरे गट घेणार 'हा' निर्णय?
Shiv Sena: विधानपरिषदेत आणखी खिंडार पडू नये यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Read More
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या व्हिजन सेंटरमध्ये बिबट्याचा बछड्याचा जन्म; सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण
Chhatrapati Sambhaji Nagar News : मादी बिबट्या व्हिजीटर सेंटरच्या आवारात मुक्तसंचार करतांना दिसत असल्याने येथील सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.  Read More
Indrayani river : वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ? इंद्रायणी आणि पवना नदीत होणारे जलप्रदूषणाबाबत उदय सामंतांच्या सूचना, काय म्हणाले?
मागील काही दिवसांपासून इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर आता या प्रदुषणासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  Read More
Kolhapur News: मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर, घरोघरी मतदार नोंदणी, मतदान कार्डवरील फोटोही बदलता येणार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार नोंदणी अधिकारी घरोघरी जावून मतदारांना याद्या दाखवतील. यादीमध्ये चूक असल्यास तर दुरुस्त करतील. नवीन मतदार नोंदणीही करतील. Read More
Nashik Crime : चार दिवसांनंतरही जेलरोडमधील 60 वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा नाही, सुरेखा बेलकर यांना सुनेला कॉल करुन नक्की काय सांगायचे होते?
Nashik News : नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या सुरेखा बेलकर या 60 वर्षीय महिलेच्या खुनाची घटना होऊन चार दिवस उलटले आहेत मात्र अजूनही या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. Read More
Kolhapur Municipal Corporation: पिण्याच्या पाण्यापासून ते कचरा कोंडाळ्यापर्यंत समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या कोल्हापूर महापालिकेला कोणी आयुक्त देता का आयुक्त?
पाण्यासाठी वणवण सुरु असतानाच कोल्हापुरात पाणी वाहून जाण्याचेही प्रकार घडत आहेत. प्रशासक असतानाही मनमानी करणारा कर्मचारी वर्ग वालीच कोणी नसताना किती तत्परतेने काम करत असेल हा संशोधनाचा विषय आहे.  Read More
Konkan News : ना हिरवळ, ना फेसाळणारे धबधबे; कोकणातील वर्षा पर्यटनाचं आकर्षण असलेलं आंबोली पावसाअभावी कोरडं ठाक
Konkan News : कोकणातील वर्षा पर्यटनाचं केंद्रबिंदू असलेलं आंबोली पावसाअभावी कोरडं ठाक पडल्यानं पर्यटनावर परिमाण झाला आहे. Read More
Kolhapur News: सर्वत्र शोधूनही चिमुकला सापडला नाही, पण हाकेच्या अंतरावरील खड्डयात पाण्यात बुडबुडे आल्याचे दिसताच..
विराज अंगणात खेळताना न दिसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण सापडला नाही. राहत्या घरापासून 20 ते 25 फुटांवर असलेल्या खड्डयात जाऊन पाहिले असता पाण्यात बुडबुडे येताना दिसून आले. Read More
Kolhapur News: बेताची परिस्थिती, आजारपणाला थकले, शेतात जाऊन सरण रचले आणि घरात येऊन मध्यरात्रीच वृद्ध दाम्पत्याने गळ्याला दोरी लावली
Kolhapur News: परिस्थिती आणि आजारपणाने बेजार झालेल्या अण्णा आणि द्वारका आईने आयुष्याचा शेवट करण्यासाठी केलेली तयारी काळजाचा थरकाप उडवणारी आहे. Read More
Darshana Pawar Murder Case : अखेर शोध संपला! दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक, हत्येचं कारण समोर
दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.  राहुल हंडोरे वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. . अखेर मुंबईतून पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं आहे Read More
शिर्डी साई संस्थानाच्या दानपेटीत दोन हजारांच्या नोटांचं भरभरुन दान; दीड महिन्यात तब्बल 12 हजार नोटा
Shirdi News: दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याच्या आरबीआयच्या निर्णयानंतर शिर्डीतील साई मंदिराच्या दानपेटीत मात्र दोन हजारांच्या नोटांचं दान वाढल्याचं दिसून आलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान  


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान होणार आहे पालखी प्रस्थान दु. 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत.  १९ दिवसांचा प्रवास करून हा पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.


आज राष्ट्रावादीचा 25 वा वर्धापन दिन 


   राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनासाठी आज शरद पवार दिल्लीत. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होईल.  प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीतले इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार  आहेत. राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई  विभागीय  राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या  वतीने आज सकाळी  09.30 वाजता मुंबईच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम  आयोजित केलाय. यावेळी खासदार जयंत पाटील , छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवार उपस्थित राहणार आङेत. 


  नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा


 नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपक्रमाअंतर्गत नांदेडमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतुल सावे, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित राहतील. या सभेत, मोदी सरकारची कामगिरी अमित शाहा जनतेसमोर मांडणार आहेत. दरम्यान नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर असतील. सकाळी 11 वाजता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. त्यानंतर भाजप कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत.  गेल्या काही दिवसांपासून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात केलीय त्या दृष्टीने नवीन नियुक्त्या केल्यात त्यापासून महाजन याना नाशिकपासून दूर ठेवल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यानंतर महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.