वाशिम : जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खेर्डा जीरापुरे शेत शिवार परिसरात एका 35 वर्षीय विवाहित महिलेचा (Women) मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिला बकऱ्या चारण्यासासाठी येथील शिवारात गेली होती. मात्र, महिलेचा शोध घेतला असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहायला मिळाले. मृत महिलेचे नाव सोनाली लवलेश कोडापे असून ती खेर्डा गावाची रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच, महिलेचा खून कोणी केला याबाबत तपास केला जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून खून व लैंगिक अत्याचाराच्या घटना पोलिसांसमोर मोठं आव्हान बनल्याचं दिसून येत आहे. 


कारंजा शहर व कारंजा ग्रामीण पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, नेमकी हत्या का? आणि कशासाठी झाली याबद्दल कुठलाही सुगावा हाती लागलेला नाही. महिलेचा मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे, नेमक शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल काय येतो, यानंतरच त्यांच्या हत्येचा तपास गतीमान होईल. दरम्यान, अनैतिक संबंध किंवा लैंगिक अत्याचार करून या महिलेची हत्या झाल्याची चर्चा परिसरात होत आहे. मात्र, तपासाअंती नेमका काय प्रकार घडला आणि या महिलेचा मारेकरी नेमक्या कोण? याचा उलगडा होईल. सध्या घटनेचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.


हेही वाचा


Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा