Maharashtra News LIVE Updates : महायुती, महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा कायम; राज्यातील प्रत्येक घडामोडीचे अपडेट एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रसह देशभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट एका क्लिकवर मिळणार. देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही अजूनही सुटलेला नाही. मागील दोन दिवसांत अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आज महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे.
Beed : भाजप आमदाराचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला
Beed : भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पडला असून, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावामध्ये कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. माजी आमदार भीमराव धोंडे हे गाव चलो अभियान या कार्यक्रमासाठी निमगाव चोभा या गावात आले होते.
Lok Sabha Elections : भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार
Lok Sabha Elections : भाजपच्या गटातून मोठी बातमी समोर येत असून, भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे. मागील पाच वर्षातील कामगिरी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात्येणार असल्याची माहिती समोर येत आहेत.
Income Tax Raid : जालन्यात आयकर विभागाची छापेमारी
Income Tax Department Raid : जालना येथे एका स्टील कंपनीवर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली असून, कर चूकवेगिरीच्या संशयावरून मुंबईतील आयकर विभागाच्या पाथकाकडून कालपासून हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती मिळतेय.
Lok Sabha Seat Sharing : 'जागावाटपावरून महायुतीत गडबड, भांडण; भविष्यात फारच भयानक परिस्थिती'
Lok Sabha Seat Sharing : जागावाटपावरून महायुतीत गडबड सुरू आहे, महाविकास आघाडीत कोणतीही गडबड नाही. आता तर महायुतीत भांडण सुरू झाले आहे. भविष्यात फारच भयानक परिस्थिती असल्याचं नाना पटोले यांनी म्हटले आहे.
बातमी लिंक : Lok Sabha Seat Sharing : 'जागावाटपावरून महायुतीत गडबड, भांडण; भविष्यात फारच भयानक परिस्थिती'