Maharashtra Live Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात बावनकुळेंच्या भेटीला, बंद दाराआड झाली चर्चा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात बावनकुळेंच्या भेटीला, बंद दाराआड झाली चर्चा
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी भेटीला पोहोचले आहेत. पारशिवनीला प्रचारासाठी जात असताना कोराडी इथल्या बावनकुळेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री पोहोचले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु आहे.
Nashik News: नाशिकच्या सिडको परिसरात गोळीबार
Nashik News: नाशिकच्या सिडको परिसरात गोळीबार करण्यात आला आहे, त्रिमूर्ती चौकातील ही घटना आहे. तलवारी नाचवत टोळक्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्रिमूर्ती चौकातील गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर आले आहे.






















