MAHARASHTRA NEWS LIVE UPDATES : राज्यात अवकाळी पावसाने शेतपिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Feb 2024 02:25 PM
Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू

Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, अपघातात ट्रक चालकाचा लोखंडाच्या प्लेट खाली दबून मृत्यू . डहाणू तालुक्यातील आंबोली जवळील घटना . चालकाने अचानक ब्रेक घेतल्याने अवजड ट्रकच्या मागे असलेल्या लोखंडी प्लेट ट्रकच्या केबिन वर आल्याने अपघात . अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी . स्थानिक पोलीस घटनस्थळी दाखल 

Baramati : 2 मार्चला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर

Baramati : येत्या 2 मार्चला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहे. बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन होत असून, हा मेळावा महायुती सरकार साठी देखील महत्त्वाचा असणार आहे. बारामतीच्या मेळाव्यासोबतच बारामतीचे बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय याचे देखील उद्घाटन होणार आहे. रोजगार मेळाव्यात पुणे विभागातील पाच जिल्हे 311 स्थानिक व बहुराष्ट्रीय कंपन्या आणि तब्बल 43 हजार 613 जागांवर नोकरीची संधी हे वैशिष्ट्य आहे.आतापर्यंत या महारोजगार मेळाव्यासाठी तब्बल 14000 जणांनी ऑनलाईन लिंकद्वारे सहभागाची नोंदणी केली असून, प्रशासनाने ऑफलाइन नोंदणी देखील ठेवलेली आहे. कार्यक्रम स्थळावरून आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने

Buldhana : शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली अवकाळी, गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी

Buldhana : शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी.


तुपकरांनी शेगाव तालुक्यात तलाठी, कृषी साह्ययक यांना थेट बांधावर घेवून जात शेतकऱ्यांना दिला आधार.


तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई द्या 


रविकांत तुपकरांची सरकारकडे मागणी.


बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीने प्रचंड नुकसान


हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल.

Bhiwandi : मनसे शहरप्रमुखाची हद्दपारी, टोरंट पॉवर विज पुरवठा कंपनीच्या विरोधात मोर्चा

Bhiwandi : टोरंट पॉवर विरोधात आंदोलन करण्यात पुढाकार घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर प्रमुख मनोज गुळवी यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल झाल्याने पोलिस उपायुक्त यांनी मनोज गुळवी यांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. त्या विरोधात नाराजीचा सूर उमटत असून टोरंट पॉवर कंपनी विरोधातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मनोज गुळवी यांची केलेली हद्दपारी तात्काळ रद्द करावी,त्याच्या निषेधार्थ टोरंट पॉवर कंपनी विरोधात कारवाई करावी अशा मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले

Pune : बारामती लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Pune : पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलीय. मात्र या बेठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे देखील पोहचलेत. वसंत मोरे यांचा कात्रज भागातील प्रभाग हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. वसंत मोरेंनी या आधीच मनसेकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच जाहीर केलय.  मात्र आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतय.

Newasa : नेवासा तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा, सोनईतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरण.

Newasa : नेवासा तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा...
सोनई येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरण...
काही जणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप...
निर्दोष असलेल्यांची सुटका करून दोषींवर कडक कारवाई करावी मागणी...
अत्याचार करणारास फाशीची शिक्षा द्या...
मात्र निर्दोष असणारांना मुक्त करा...
आरपीआय, एकलव्य संघटनेसह हजारो आंदोलक मोर्चात सहभागी...
मोर्चा नेवासा तहसीलवर धडकला...

Politics : महाविकास आघाडीच्या आज मुंबईत होणाऱ्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित राहणार

Politics : महाविकास आघाडीच्या आज मुंबईत होणाऱ्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित राहणार


 डॉ धैर्यवर्धन पुंडकर  हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज बैठकीला उपस्थित राहणार आहेत


 वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महासभा  पुण्यात होत असताना  प्रकाश आंबेडकर यांचे सह अनेक महत्त्वाचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सभेसाठी पुण्यात आहेत


 मात्रा असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन वंचित बहुजन आघाडी आजच्या  बैठकीतील चर्चेसाठी उपस्थित राहणार आहे


 2 फेब्रुवारी नंतर आज ही बैठक होत असताना वंचित बहुजन आघाडी कडून पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील पक्षांच्या जागावाटपसंदर्भातील अंतिम निर्णयावर चर्चा करण्याची विनंती केली जाणार आहे


 सोबतच वंचित बहुजन आघाडीने  पाठवण्यात आलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्राम वर महाविकास आघाडीतील  पक्षांचे मत सुद्धा जाणून घेतले जाणार आहे

Politics : महाविकास आघाडीच्या आज मुंबईत होणाऱ्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित राहणार

Politics : महाविकास आघाडीच्या आज मुंबईत होणाऱ्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित राहणार


 डॉ धैर्यवर्धन पुंडकर  हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज बैठकीला उपस्थित राहणार आहेत


 वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महासभा  पुण्यात होत असताना  प्रकाश आंबेडकर यांचे सह अनेक महत्त्वाचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सभेसाठी पुण्यात आहेत


 मात्रा असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन वंचित बहुजन आघाडी आजच्या  बैठकीतील चर्चेसाठी उपस्थित राहणार आहे


 2 फेब्रुवारी नंतर आज ही बैठक होत असताना वंचित बहुजन आघाडी कडून पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील पक्षांच्या जागावाटपसंदर्भातील अंतिम निर्णयावर चर्चा करण्याची विनंती केली जाणार आहे


 सोबतच वंचित बहुजन आघाडीने  पाठवण्यात आलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्राम वर महाविकास आघाडीतील  पक्षांचे मत सुद्धा जाणून घेतले जाणार आहे

Pune : मनसेची मराठी स्वाक्षरी मोहीम, या अभियानाचे यंदा 15 वे वर्ष

Pune : मराठी भाषा लोकव्यवहारात यावी, याचा प्रसार आणि प्रचार व्हावा व मराठी अस्मिता वाढावी यासाठी मनसेची मराठी स्वाक्षरी मोहीम 


27 फेब्रुवारी जागतिक मराठी गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर व कसबा विभाग यांनी आयोजन केले आहे 


या अभियानाचे यंदा १५ वे वर्ष आहे

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 5 मार्चला महाराष्ट्र दौरा

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 5 मार्चला महाराष्ट्र दौरा आहे
अकोला क्लस्टरची मीटिंग
जळगावमध्ये युवासंमेलन
संभाजीनगर मध्ये जाहीर सभा

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात अमळनेर, रावेर, पारोळा सह- चाळीसगाव तालुक्यात गारपीट

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात अमळनेर रावेर पारोळा सह चाळीसगाव तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसला असून सर्वाधिक नुकसान चाळीसगाव तालुक्यात झाले आहे.


काल रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या वादळ, गारपीट अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय


चितेगाव, शामवाडी, बेलदारवाडी, कोदगाव, शिवापूर तांबोळे, पिंप्री, गणेशपुर, पाटणा, ओढरे, इत्यादी गावांना प्रामुख्याने गारपिठीची मोठा फटका बसला आहे...


कांदा, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा हे रब्बी पिक जमीनदोस्त झाल्याने शेकडो एकर वर मोठे नुकसान झाले आहे......

Bhandara : भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या लोकार्पण, भंडारा-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा महामार्ग ठरणार

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील साकोली - लाखांदूर या दोन तालुक्यातून जाणाऱ्या आणि गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा ते शेवटच्या टोकावरील सिरोंचापर्यंत जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 C चं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. यवतमाळ इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असून यावेळी ते महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. च्या हस्ते होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या आणि गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं ही लोकार्पण होत आहे. 

Jitendra Awhad : जरांगेना फोन कुणी केलं हे तपासा, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड ऑन एसआयटी


मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांचे आहेत


जरांगे पाटील यांच्या बाजूला कोण बसल होते


जरांगेना फोन कुणी केलं हे तपासा 


रश्मी शुक्ला यामध्ये तज्ञ आहेत त्याना सांगा शोधा म्हणून


राजेश टोपे किंवा कुणीही असो करा की चौकशी

Manoj Jarange - फडणवीस साहेब शेलार साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार. मनोज जरांगे पत्रकार परिषद

Manoj Jarange - मनोज जरांगे पत्रकार परिषद


मी मराठ्यांचे काम करतोय,
- ते सत्तेचा वापर करणार
- फडणवीस साहेब शेलार साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार
- मी कुठेच चुकीचं नाही
- कुठेच गुंतू शकत नाही
- न्यायचं त्या तुरुंगात न्या... चौकशी लावा
- मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आहेत
- फेस कॉल वर काय काय बोललेत मी पण ओपन करतो
- आता म्हणले तर मी आता सलाईन उचलून चौकशीला येतो
- ज्या मंत्र्याने आदेश दिलेत ना... ते मंत्री, 600-650 अधिकारी बाहेर येतील
- गिरीश महाजन साहेब त्या दिवशी येणार होते.. पण, आले नाहीत गृहमंत्रालयाने करायला सांगितलं आहे आम्ही निपतवून घेतो... असा फोन होता... 
- आमच्याकडे रेकॉर्डिंग असेल... बघतो मी आता
- तुमच्या मागच्या byte काढा
- काढा शोधून... SIT लावा
- राज्यातील सगळं एकदाच होय द्या
- पोलीस सुद्धा मध्ये घाला

Manoj Jarange - देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच, मनोज जरांगे पत्रकार परिषद

Manoj Jarange - देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच
- ते जोवर असं करणार तोवर आम्ही बोलणार
- आम्हाला माहिती होतं ते पुढे असं करणार
- शेवटी याचा गौप्यस्फोट होणं गरजेचं होतं
- न्यायालय आम्हाला न्याय देईल
- काल संचारबंदी लावायला काय कापाकापी झाली होती का? कशी लावली संचारबंदी?
- तिथे काय पाकिस्तानचे दहशतवादी सापडले होते का?
- मोदी सहेबांसाठी तरी हे चांगलं आहे का?
- तुम्ही मर्यादा तोडली म्हणून ही पावलं उचलली
- काल गृहमंत्र्यांची जबाबदारी होती...

Manoj Jarange : मराठा बांधवांना सांगायचं आहे की तब्बेत व्यवस्थित आहे

Manoj Jarange - मराठा बांधवांना सांगायचं आहे की तब्बेत व्यवस्थित आहे
- काहींचा गैरसमज झाला होता... काही झालंय का काय, अटक झालीय का काय
- मी आता व्यवस्थित आहे
- पुन्हा तुमच्या भेटायला येणार आहे
- पुन्हा शांततेत करायचं आहे
- साखळी उपोषण, धरणे आंदोलन करायचं आहे
- आता आमरण उपोषण सुरू असेल तर थांबवा

Vasai : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई हद्दीत वाहतूक कोंडी

Vasai : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई हद्दीत आजही पूर्णपणे वाहतूक कोंडी


वाहतुक कोंडीचा फटका रुग्णवाहीकेंना ही करावा लागतोय.


आज यांच महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी एक रुग्णवाहीका सुमारे अडीच तास अडकली


या रुग्णवाहिकेत एक तान्हुले बाळ होते.  

Vasai : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई हद्दीत वाहतूक कोंडी

Vasai : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई हद्दीत आजही पूर्णपणे वाहतूक कोंडी


वाहतुक कोंडीचा फटका रुग्णवाहीकेंना ही करावा लागतोय.


आज यांच महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी एक रुग्णवाहीका सुमारे अडीच तास अडकली


या रुग्णवाहिकेत एक तान्हुले बाळ होते.  

Shivsena : शिवसेनेच्या पक्ष निधी प्रकरणाची आता आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार

Shivsena : शिवसेना शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर करण्यात आले.


तरीही शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षनिधीतून सुमारे 50 कोटी रुपये काढण्यात आल्याची तक्रार


शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली होती.


यासंबंधी शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली होती 


ठाकरे गटाकडून पक्षनिधीतून पैसे काढल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर


आता याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

Nashik - कांदा दरात घसरण सुरूच..कालच्या बंदनंतर 200 रुपये प्रतिक्विंटल भाव घसरले.

Lasalgaon Nashik - कांदा दरात घसरण सुरूच..
- जिल्ह्यातील बाजार समितीमधील कालच्या बंदनंतर २०० रुपये प्रतिक्विंटल भाव घसरले.
- लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी १६२५ रुपये प्रति क्विंटल भाव...
- कमीत कमी ८०० तर जास्तीत जास्त १८४८ रुपये..
- शनिवारच्या तुलनेत २०० रुपयांनी भाव खाली..
- लासलगावसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा दरात घसरण...

Maratha Andolan : मराठा आंदोलनात झालेल्या नुकसानीची माहिती संकलन करण्यास सुरवात

Maratha Andolan : मराठा आंदोलनात झालेल्या नुकसानीची माहिती संकलन करण्यास सुरवात


मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून नुकसानीची माहिती संकलन केली जाणार 


जिल्हा प्रशासनला  वरिष्ठ पातळीवर किंवा अधिवेशनात माहिती मागितल्यास तयार असावी म्हणून माहिती संकलित करण सुरु आहे


गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून होता असतानाच नुकसानीची माहिती संकलन करण सुरू.

Nashik - शेतकरी आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना, 11 जणांचा सहभाग

Nashik - शेतकरी आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना


- शिष्टमंडळात 11 जणांचा सहभाग


- विविध मागण्यांसंदर्भात आज विधिमंडळात सरकारसोबत बैठक


- कालपासून आदिवासी शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे बेमुदत आंदोलन


- आजच्या बैठकीत तोडगा निघणार का ? याकडे लक्ष

Nashik : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे पुरस्काराची घोषणा

Nashik : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे, वि वा शिरवाडकर लेखन पुरस्कार अशोक हांडे यांना जाहीर करण्यात आलाय, तर वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार प्रख्यात दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल आणि बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार नाशिकचे ज्येष्ठ अभिनेते सदानंद जोशी यांना जाहीर करण्यात आलाय. नाट्य परिषदेच्या वतीने दर दोन वर्षांनी पुरस्कार दिले जातात.  राजभाषा दिनाच्या निमित्ताने पुरस्कार जाहिर केले जातात. यंदाच्या वर्षीपासून पुरस्कारच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. वि वा शिरवाडकर आणि कानेटकर पुरस्काराची रक्कम प्रत्येकी 25 हजार होती, ती आता 31 हजार करण्यात आली आहे, तर बाबुराव सावंत पुरस्काराची रक्कम 11 हजार होती ती आता 15 हजार करण्यात आली आहे, मे महिन्याच्या अखेरीस पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

Mumbai : अखेर गोखले पूल वरून वाहतूक सुरू, मुंबईकरांना दिलासा

Mumbai : अंधेरी येथील गोखले पुलाचे उद्घाटन पार पडले असून एक लेन आज पासून येण्या जाण्यास उपलब्ध झाली आहे.या मुळे या पश्चिम द्रुतगती मार्गावरून अंधेरीकडे जाणारी मोठी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.मात्र पुढील काही दिवसात दुसऱ्या गार्डर लाँचिंग चे काम ही हाती घेतले जाणार असून ते काम पूर्ण होण्यास काही महिने लागणार आहेत. एक वाहिनी सुरु केल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आज दापोलीत आणि उद्या रत्नागिरीत]
BJP : भाजप कडून रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.याच अनुषंगाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. आज दापोलीत सायंकाळी साडेसहा वाजता राधाकृष्ण मंदीर हॉलमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातील उत्तर रत्नागिरीतील भाजपच्या बूथ पदाधिकारी यांच्या मेळाव्यात सावंत हे  मार्गदर्शन कणार आहेत. तर उद्या रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख आणि पदाधिकारी यांना सावंत मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी दहा वाजता होणाऱ्या मेळाव्याला रत्नागिरी चिपळूण संगमेश्वर लांजा राजापूर या तालुक्यामधील बूथ प्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती भाजपकडून कळते..
Latur : औसा पोलीस ठाण्याच्या वाहन चालकाचा अपघाती मृत्यू, रात्री गस्तीवरील वाहन उसाच्या ट्रॅक्टरला धडकले

Latur : औसा पोलीस ठाण्याच्या जीपला रात्री पेट्रोलिंग वर असताना अपघात झाला आहे. औसा लातूर रस्त्यावरील बुधोडा येथे उसाच्या ट्रॅक्टरला जीपची जोरदार धडक बसली. या अपघातात पोलीस जीप चे वाहन चालक युवराज दिलीप पांचाळ हे जबर जखमी झाले होते. त्यांच्याबरोबर असलेले पोलीस कर्मचारी मोतीराम घुले आणि होमगार्ड धीरज मुंजाळ यांनाही गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमी तिघांनाही लातूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. मातृ उपचारादरम्यान वाहन चालक युवराज दिलीप पांचाळ यांचा मृत्यू झाला आहे.

Latur : औसा पोलीस ठाण्याच्या वाहन चालकाचा अपघाती मृत्यू, रात्री गस्तीवरील वाहन उसाच्या ट्रॅक्टरला धडकले

Latur : औसा पोलीस ठाण्याच्या जीपला रात्री पेट्रोलिंग वर असताना अपघात झाला आहे. औसा लातूर रस्त्यावरील बुधोडा येथे उसाच्या ट्रॅक्टरला जीपची जोरदार धडक बसली. या अपघातात पोलीस जीप चे वाहन चालक युवराज दिलीप पांचाळ हे जबर जखमी झाले होते. त्यांच्याबरोबर असलेले पोलीस कर्मचारी मोतीराम घुले आणि होमगार्ड धीरज मुंजाळ यांनाही गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमी तिघांनाही लातूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. मातृ उपचारादरम्यान वाहन चालक युवराज दिलीप पांचाळ यांचा मृत्यू झाला आहे.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषद मुख्य प्रतोद पदी अमोल मिटकरी यांची वर्णी लागण्याची शक्यता

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषद मुख्य प्रतोद पदी अमोल मिटकरी यांची वर्णी लागण्याची शक्यता


आमदार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाल या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होत असल्याने अमोल मिटकरी यांना मुख्य प्रतोदपदी नियुक्त करण्याची विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे पक्षाची मागणी


आज उपसभापती नीलम गोरे मुख्य प्रतोद पदी अमोल मिटकरी यांचे नाव घोषित करण्याची शक्यता

Nashik : 7-8 हजार शेतकरी आंदोलक विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर तळ ठोकून

Nashik : आदिवासी शेतकरी आणि कामगारांचे विविध प्रश्न घेऊन किसान लॉंग मार्च काल नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता,


शेकडो किलोमीटरची पायपीट केल्यानंतर 7 ते 8 हजार आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालत रात्र रस्त्यावरच काढलीय.


हे सरकार आमची फसवणूक करत असून वारंवार आमच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ येते आहे


त्यामुळे जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा ईशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. 

Maharashtra Rain : पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

Maharashtra Rain : पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज


विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी.


देशासह राज्यातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला


अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आहे. 

Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील 16 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Yavatmal : निवडणूक आयोगाच्या निकषानुसार एका जिल्ह्यात कार्यकारी पदावर 3 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला, अशा सर्व अधिकाऱ्यांची जिल्ह्या बदली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावरून अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बदल्याची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातून 16 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर 16 अधिकारी देण्यात आले आहेत. यात 3 पोलिस निरीक्षक, 8 सहायक पोलिस निरीक्षक व 5 पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड गारपीट, रब्बी पिकांचं मोठ नुकसान, 13 तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

Buldhana :  बुलढाणा जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळ पासून मेघगर्जना व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यात अनेक भागात गारपीट झाल्याने शेताच्या नुकसानीसह तापमानात मोठा गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात वादळी पाऊस असल्याने जिल्ह्यात विज पुरवठा खंडीत करण्यात आला असून जिल्हा अंधारात होता... ठिकठिकाणी गारपीट झाल्याने हवेत प्रचंड गारवा वाढला आहे. त्यामुळे आता मानवी आरोग्यावर याचा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. 

Pune : पुणे शहराजवळ तब्बल 9000 लिटर दारू केली जप्त

Pune : पुणे शहराजवळ तब्बल 9000 लिटर दारू केली जप्त


पुणे ग्रामीण पोलिसांची अवैध व्यावसायावर मोठी छापेमारी


पुणे शहराजवळ पोलिसांनी जप्त केला मोठा दारूसाठा


ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर


उरुळी कांचन पोलीसांची मोठी कारवाई


पुणे शहराजवळ सोरतापवाडी जवळ पोलीसांनी हातभट्टीवर मोठा छापा टाकून जवळपास नऊ हजार लिटर हातभट्टी दारू केली जप्त


सोरतापवाडी भागात पोलिसांच्या २ ठिकाणी कारवाई

Mumbai : आज मुंबईत पाणीबाणी, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बाधित होणार

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागण्याची घटना (दिनांक २६ फेब्रुवारी २०२४) घडली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरिय जलाशय, ट्रॉम्बे उच्चस्तरिय जलाशय, घाटकोपर निम्नस्तरिय जलाशय तसेच शहर विभागातील एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग, गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा आज मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील.तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई 2 व 3जलवाहिन्यातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. 

PM Modi : पंतप्रधान मोदी 27-28 फेब्रुवारीला महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू राज्यांना भेट देणार

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27-28 फेब्रुवारी रोजी केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना भेट देणार


27 तारखेला पंतप्रधान केरळमध्ये तर 28 तारखेला तामिळनाडू आणि महाराष्ट्रात असतील.


पंतप्रधान महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाला लाभ देणारे अनेक सिंचन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. 

Marathi Bhasha Gaurav Din : आज 'मराठी भाषा गौरव दिवस' ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस

Marathi Bhasha Gaurav Din : आज 'मराठी भाषा गौरव दिवस'


महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर 'कुसुमाग्रज' यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो


कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं 


मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.